सोलापूरमधील  केगाव येथील अपघातात वडवळचे पिता-पुत्र ठार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 17:36 IST2017-09-22T17:36:00+5:302017-09-22T17:36:23+5:30

सोलापूरहून वडवळकडे मोटारसायकल वरून येताना थांबलेल्या ट्रकवर मोटारसायकल धडकून झालेल्या अपघातात वडवळ ता मोहोळ येथील पिता-पुत्र ठार झाले. अण्णासाहेब मोरे(वय-४५) व संग्राम अण्णासाहेब मोरे वय(२१) अशी या पिता पुत्रांची नावे आहेत.  

Bastar's father and son killed in an accident at Kegaon in Solapur | सोलापूरमधील  केगाव येथील अपघातात वडवळचे पिता-पुत्र ठार  

सोलापूरमधील  केगाव येथील अपघातात वडवळचे पिता-पुत्र ठार  

सोलापूर, दि. २२ -  सोलापूरहून वडवळकडे मोटारसायकल वरून येताना थांबलेल्या ट्रकवर मोटारसायकल धडकून झालेल्या अपघातात वडवळ ता मोहोळ येथील पिता-पुत्र ठार झाले. अण्णासाहेब मोरे(वय-४५) व संग्राम अण्णासाहेब मोरे वय(२१) अशी या पिता पुत्रांची नावे आहेत.  
सिव्हिल पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वडवळ येथील अण्णासाहेब मोरे व संग्राम मोरे हे सोलापूरहून वडवळकडे जाताना त्यांची दुचाकी एम एच १३ सी आर ६१७० डाळिंब संशोधन केंद्र केगाव ता उत्तर सोलापूरजवळ थांबलेल्या ट्रकवर आदळली यावेळी संग्राम मोरे हा मोटार सायकल चालवीत होता त्याच्या पाठीमागे वडील अण्णासाहेब मोरे बसले होते यावेळी जोरदार धडक बसल्याने वडील अण्णासाहेब मोरे हे जागीच ठार झाले तर मुलगा संग्राम हा सोलापूर येथे उपचारास नेल्यानंतर मरण पावला. 
अण्णासाहेब मोरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे वडवळ येथील नागनाथ मंदिरा समोर हे पिता पुत्र नारळ पेढे विक्रीचा व्यवसाय करीत होते. वडील अण्णासाहेब मोरे यांच्या डोळ्यांच्या आजारपणासाठी संग्राम त्यांना सोलापूर ला घेऊन गेला होता. दवाखाना आटपून पुन्हा गावाकडे येताना हा अपघात घडला. 

एकाच आठवड्यात तीन जणांचा अपघाती मृत्यू, वडवळ गावावर शोककळा
मागील आठवड्यात १४ सप्टेंबर रोजी वडवळ येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विजय कुमार चव्हाण यांचा पोलिसाच्या कारने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला होता. ही घटना घडून आठ दिवस झाले नाही तर आज पिता पुत्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने वडवळ गावा वर शोककळा पसरली आहे.  शोकाकुल वातावरणात या पिता पुत्रावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Web Title: Bastar's father and son killed in an accident at Kegaon in Solapur

टॅग्स :Accidentअपघात