बार्शीत प्राध्यापकाचे घर फोडले; दोन लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 15:48 IST2019-03-04T15:47:29+5:302019-03-04T15:48:25+5:30

बार्शी : बार्शी शहरातील सुभाष नगर पाण्याच्या शेजारील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सुमारे दीड लाख रुपये रोख आणि ...

Barshi broke the professor home; Lakhs of two lakhs | बार्शीत प्राध्यापकाचे घर फोडले; दोन लाखांचा ऐवज लंपास

बार्शीत प्राध्यापकाचे घर फोडले; दोन लाखांचा ऐवज लंपास

ठळक मुद्देदीड लाख रुपये रोख व गंठण, अंगठ्या, कानातील फुले असे सोन्याचे व काही चांदीचे दागिने घेऊन चोर पसारयाबाबत अद्याप पोलिसात गुन्हा नोंद झाला नाही.

बार्शी : बार्शी शहरातील सुभाष नगर पाण्याच्या शेजारील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सुमारे दीड लाख रुपये रोख आणि सुमारे साडेचार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवार मध्यरात्री घडली. याबाबत अद्याप पोलिसात गुन्हा नोंद झाला नाही.

यायाबत अधिक माहिती अशी की, श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात प्राध्यापक असलेले अशोक दिगंबर सुर्वे हे त्यांची पत्नी मंदाकिनी आणि मुलगा अजित यांच्या सोबत राहतात. रविवारी रात्री घरातील हॉल मध्ये झोपले होते. त्यावेळी त्यांनी दोन्ही बेडरूमला कुलूप लावले होते. मध्यरात्री अडीचच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील चाव्यांनी गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

त्याचदरम्यान घरातील सुर्वे कंपनी झोपलेल्या हॉलला ही चोरट्यांनी बाहेरून कडी लावली. व आपला मोर्चा बंद असलेल्या बेडरूम कडे वळवला. कुलूप तोडून आत प्रवेश केला. व कपाटाचे दरवाजे तोडून कपाटातील सामान बाहेर अस्ताव्यस्त टाकले व कपाटातील पगाराचे आलेले ९० हजार तसेच सुर्वे यांच्या पत्नीने जमा केलेले ६० हजार असे दीड लाख रुपये रोख व गंठण, अंगठ्या, कानातील फुले असे सोन्याचे व काही चांदीचे दागिने घेऊन चोर पसार झाले. 

Web Title: Barshi broke the professor home; Lakhs of two lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.