शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

खराब रस्त्यावर केले वृक्षारोपण

By admin | Updated: June 11, 2014 00:40 IST

काँग्रेस नगरसेवकांनी वेधले पालिकेचे लक्ष

बार्शी : गेल्या अनेक वर्षांपासून एखाद्या खेड्यातील रस्त्यापेक्षा वाईट अवस्था झालेल्या उपळाई ते परांडा रोडला जोडणाऱ्या फुले मंगल कार्यालयासमोरील रोडवरील खड्ड्यात काँग्रेसच्या नगरसेवकांनी वृक्षारोपण करुन या रस्त्याच्या दुरवस्थेकडे पालिकेचे लक्ष वेधले़ मंगळवारी सकाळी ही घटना घडली.बार्शी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या फुले मंगल कार्यालयासमोरील या ५०० मीटर रस्त्याची गेल्या तीन-चार वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. जवळपास दीड ते दोन फुटाचे खड्डे या रस्त्यावर आहेत़ त्यात या रस्त्यावर सतत पाणी येत असल्यामुळे चिखलाचे देखील साम्राज्य असते़ विशेष म्हणजे हा रस्ता बार्शी-परांडा या राज्य रस्त्याला जोडणारा आहे, त्यामुळे पालिकेने इकडे लक्ष द्यायला हवे होते, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक व नगरसेवकांनी वेळोवेळी मागणी करुन देखील हा रस्ता दुरुस्त केला जात नाही़, असे दीपक राऊत यांनी सांगितले. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे व्यावसायिक व नागरिक वैतागले आहेत. त्यामुळेच आज (मंगळवारी) पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे लक्ष वेधण्यासाठीच काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी या रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करुन आंदोलन छेडले. यावेळी नगरसेवक अशोक बोकेफोडे, दीपक राऊत, महेदीमियाँ लांडगे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष काका फुरडे, किशारे मांजरे, युवराज ढगे, विशाल खलसे, सादिक मुल्ला, कय्युम पटेल, गौतम सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते़ ----------------------हा रस्ता प्रभाग क्र. ६ मधील विरोधी पक्षाच्या नगरसेवकाच्या प्रभागात येत आहे़ विरोधी नगरसेवकाविषयी नागरिकांत नाराजी वाढावी म्हणून जाणीवपूर्वक काम केले जात नाही, काम मंजूर असून वर्कआॅर्डर होऊनही काम होत नाही याचा अर्थ काय? - अशोक बोकेफोडे नगरसेवक, काँग्रेस ---------------------------------रस्त्याची वर्कआॅर्डर झालेली आहे़ आम्ही कामे करीत असताना विरोधक व सत्ताधारी असा भेदभाव कधीच केलेला नाही व पुढेही करणार नाही़ काँग्रेसचे आजचे आंदोलन म्हणजे केवळ राजकीय स्टंट आहे़ शहरातील इतर भागातही टप्प्याटप्प्याने कामे सुरु आहेत़ - नागेश अक्कलकोटे गटनेता राष्ट्रवादी काँग्रेस