शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

बागलांची घड्याळाला प्रामाणिक साथ.. ‘वंचित’ची चावीही चांगलीच फिरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 2:07 PM

मतविभागणीवरच भवितव्य;  कमळ, घड्याळाचाही मताधिक्याचा दावा, जगताप-पाटील गटाचे जमले

ठळक मुद्देमाढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या करमाळा विधानसभा मतदारसंघात करमाळा शहरासह ११८ गावे व माढा तालुक्यातील कुर्डूवाडी शहरासह ३६ गावांचा समावेश निवडणुकीत एकूण ३ लाख २ हजार ८९५ मतदारांपैकी १ लाख ८८ हजार ९९९ इतके म्हणजे ६२.४० टक्के मतदान झाले खरी लढत राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे विरूध्द भाजप-शिवसेना व मित्रपक्षांचे उमेदवार रणजित नाईक-निंबाळकर या दोघांतच

नासिर कबीर 

करमाळा : घड्याळाकडे पाहून बागल गटाने संजयमामा शिंदे यांना प्रचारात प्रामाणिकपणे साथ दिली असून, वंचित बहुजन आघाडीची चावी चांगलीच फिरली. मतविभागणीचा फटका कोणाच्या मताधिक्याला ब्रेक लावणार याची गणितं मांडली जाऊ लागली आहेत. आम्हीच मताधिक्य घेणार, असा दावा कमळ व घड्याळवाले करू लागले असून, मताधिक्यावर पैजाही लागल्या  आहेत. 

माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या करमाळा विधानसभा मतदारसंघात करमाळा शहरासह ११८ गावे व माढा तालुक्यातील कुर्डूवाडी शहरासह ३६ गावांचा समावेश आहे. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत एकूण ३ लाख २ हजार ८९५ मतदारांपैकी १ लाख ८८ हजार ९९९ इतके म्हणजे ६२.४० टक्के मतदान झाले आहे. निवडणूक रिंगणात तब्बल ३१ उमेदवार आमने-सामने होते. पण खरी लढत राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे विरूध्द भाजप-शिवसेना व मित्रपक्षांचे उमेदवार रणजित नाईक-निंबाळकर या दोघांतच आहे. 

झेडपी अध्यक्ष संजयमामा शिंदे करमाळा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडल्याने आपला विधानसभा निवडणुकीचा मार्ग सुकर झाल्याचे समजून बागल गटाने रश्मी बागल आता आमदार होणार म्हणून संजयमामांना कसल्याही परिस्थितीत करमाळ्यातून मताधिक्य मिळवून द्यायचेच या विचाराने संपूर्ण प्रचार यंत्रणा बागल गटाने सांभाळली. विशेष म्हणजे संजयमामा शेवटच्या प्रचार सांगता सभेच्या दिवशी एकदाच राजुरीमध्ये आले. पण त्यांच्या पश्चात यशवंत शिंदे यांच्या साक्षीने रश्मी बागल, दिग्विजय बागल या दोघांनी तालुक्यात प्रत्येक गावात मतदारांच्या गाठीभेटी व सभांद्वारे प्रचार केला.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडीपासून एकमेकांपासून दुरावलेले आ. नारायण पाटील व जगताप गट पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित आले तर निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी आ. जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभुराजे जगताप यांनी भाजपत प्रवेश करून आपला राजकीय प्रवासही सुरू केला आहे. तालुक्याच्या राजकारणात बोटावर मोजण्याइतपत कार्यकर्ते असलेला भाजप मोहिते-पाटील व जगताप यांच्या प्रवेशाने तालुक्यात मोठा पक्ष बनला आहे. 

गतवेळी सदाभाऊंना मताधिक्य

  • - गत लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना १६ हजारांचे मताधिक्य करमाळा मतदारसंघातून मिळाले होते. 

नेहमीच काँग्रेसविरोधकांना मताधिक्य

  • - २००९ ची लोकसभा निवडणूक वगळता येथे काँग्रेसच्या विरोधकांनाच मताधिक्य मिळत गेलेले आहे. यंदाच्या निवडणुकीत नवीन मतदार वाढला असून, त्यांचा कौल कोणला? विजयी होण्याची क्षमता नसलेल्या वंचित बहुजन आघाडीस मिळालेला प्रतिसाद, शहरात कमळ तर ग्रामीण भागात घड्याळ या चर्चेने कोणाला मताधिक्य मिळणार, याविषयी चर्चा सुरू आहे.
टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmadha-pcमाढाElectionनिवडणूकVotingमतदान