बाबो...महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटच्या टॉपटेन सिटीत आता सोलापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 01:20 PM2021-04-02T13:20:39+5:302021-04-02T13:24:52+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Babo ... don't stop Corona; Solapur now in Topten City, a hotspot in Maharashtra | बाबो...महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटच्या टॉपटेन सिटीत आता सोलापूर

बाबो...महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटच्या टॉपटेन सिटीत आता सोलापूर

Next

सोलापूर : कोरोनाच्या विषाणूंचा कहर कायम आहे. महाराष्ट्रातील टॉपटेन हॉटस्पॉट शहराची नावे समोर आली असून त्यात सोलापूरचा समावेश आहे. पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अहमदनगर, जळगावनंतर सोलापूरचा क्रमांक आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात ५ हजार ९८५ रूग्ण बाधित असून त्यांच्या विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, आतापर्यंत सोलापूर शहर व जिल्ह्यात ८ लाख १९ हजार ८२० संशयित, ६२ हजार ३९२ बाधित रूग्ण तर उपचारानंतर ५४ हजार ३७६ रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे.  ग्रामीण भागातील बाधीत रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार १ झाली आहे. यापैकी ४१ हजार ४७५ जण बरे झाले आहेत. अद्यापही ३ हजार २८९ जण रुग्णालयात आहेत. मृतांची एकूण संख्या १२३७ झाली आहे. शहरातील बाधीत रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ३९१ झाली आहे. यापैकी १२ हजार ९०१ जण बरे झाले आहेत. अद्यापही २ हजार ७५९ जण बरे झाले आहेत. मृतांची एकूण संख्या ७३१ झाली आहे.

वाढती रूग्णसंख्या कमी करण्यासाठी मनपा व जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. गर्दी होऊ नये यासाठी शहर व जिल्ह्यात कडक निर्बंध लावले आहेत, शिवाय सोलापुरात रात्रीची संचारबंदी सुरूच आहे. 

 

 

Web Title: Babo ... don't stop Corona; Solapur now in Topten City, a hotspot in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.