शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

सोलापुरातील उपप्रादेशिक परिवहनच्या जप्त वाहनांचा २१ सप्टेंबरला लिलाव

By appasaheb.patil | Updated: September 14, 2022 12:00 IST

लिलावात बस, ट्रक, डी व्हॅन, पिकअप व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, जेसीबी या वाहनांचा समावेश

सोलापूर  : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्हयांतर्गत जप्त केलेल्या २५ वाहनांचा जाहीर ई-लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथे  २१ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे.

वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथील आवारात १२ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२२ दरम्यान कार्यालयीन वेळेत पाहणीसाठी उपलब्ध आहेत. जाहीर ई-लिलावात एकूण २५ वाहने उपलब्ध आहेत. यात बस, ट्रक, डी व्हॅन, पिकअप व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, जेसीबी या वाहनांचा समावेश आहे. तसेच ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहील, याची वाहन मालकांनी नोंद घ्यावी. ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांचे सूचना फलकांवर जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे.

इच्छुक व्यक्तींना वाहनांची प्रत्यक्ष पाहणी करता येईल. ई-लिलावात सहभागी होण्यासाठी  19 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथे खटला विभागात सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रत्येक वाहनांसाठी पन्नास हजार रूपयाचा डिमांड ड्राफ्टसह ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी करणे व कागदपत्रे पडताळणी, अप्रुव्हल करुन घेण्यासाठी सादर करणे गरजेचे आहे.

लिलावाचे अटी व नियम सोमवार १२ सप्टेंबर २्०२२ पासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथील नोटीस बोर्डावर सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यंत उपलब्ध राहील. सदर वाहने “जशी आहेत तशी" या तत्त्वावर जाहिर ई-लिलावाद्वारे विकली जातील. कोणतेही कारण न देता सदर जाहिर लिलाव रद्य करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी, सोलापूर यांनी स्वत:कडे राखून ठेवले आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरRto officeआरटीओ ऑफीस