शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल

By admin | Updated: June 14, 2014 01:46 IST

नातेपुतेतील प्रकार; विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू प्रकरण

नातेपुते : कुरभावी (ता. माळशिरस) येथील शेतकरी संजय गोविंद रूपनवर (वय ४0) शेतातील तार बदलण्यासाठी गेले असता, तुटलेल्या तारेचा शॉक बसून जागीच मृत्यू झाला. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी संतप्त ग्रामस्थांनी वीज कंपनी कार्यालयावर हल्लाबोल करीत तोडफोड केली. कुरभावीत चार महिन्यांपासून विजेची वेळ सकाळी साडेआठ ते दुपारी एकपर्यंत व दुपारी ते ३ ते साडेतीनपर्यंत होती. आठ दिवस संजय रूपनवर यांच्या शेतामध्ये लाईटची तार तुटून पडली होती. याबाबत संजय रूपनवर यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत वारंवार तक्रारी केल्या; मात्र वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना या तुटलेल्या तारेतील वीज प्रवाहाचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान ते बराच वेळ घरीच न आल्याने शोधाशोध केली असता, शोधणाऱ्यांना मृतावस्थेत ते आढळले. याबाबत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगूनही कोणीच लक्ष दिले नाही तर अधिकारी कोल्हे यांना सांगताच मी ढाब्यावर जेवण करीत आहे, असे सांगून थोड्या वेळाने येत असल्याचे सांगितले. दरम्यान, संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मृतदेह घेऊन वीज कंपनीचे कार्यालय गाठले आणि कर्मचाऱ्यांना विनंती करूनही काहीच उपयोग होत नसल्याने हल्लाबोल करीत कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले. तत्काळ घटनास्थळी अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील यांनी धाव घेऊन ग्रामस्थांना कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.-----------------------------कारवाईचा प्रस्तावहा सगळा प्रकार घडल्यानंतर कार्यकारी अभियंता चटलवार यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन सहायक अभियंता कोल्हे व दुय्यम अभियंता बडवे व वायरमन जाधव यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठवू असे सांगितले. ----------------------------------वीज कंपनीकडून मदतमयत शेतकरी संजय रूपनवर यांच्या कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून २0 हजार रूपये तर नंतर दोन लाख मदत जाहीर करण्यात आली. रूपनवरच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.