शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लाेकसभा निवडणूक हाेताच टाेलची दरवाढ जाहीर, साेलापूर-पुणे, साेलापूर-सांगली प्रवास महागला

By राकेश कदम | Updated: June 2, 2024 12:48 IST

साेलापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर एकूण चार टाेल नाके आहेत. साेलापूर जिल्ह्याच्या हद्दीत वरवडे आणि सावळेश्वर हे दाेन टाेल नाके आहेत.

लाेकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातले मतदान शनिवारी पार पडले. यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवरील टाेलचे नवे दर जाहीर केले. साेलापूर-पुणे, साेलापूर-सांगली, साेलापूर-विजापूर, साेलापूर-अक्कलकाेट, साेलापूर-येडशी या मार्गावर कारचा, जीपचा प्रवास पाच रुपयांनी महागला आहे. गेल्या दहा वर्षांत टाेलचे दर तिप्पट झाल्याचे दिसून येत आहेत. 

साेलापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर एकूण चार टाेल नाके आहेत. साेलापूर जिल्ह्याच्या हद्दीत वरवडे आणि सावळेश्वर हे दाेन टाेल नाके आहेत. या दाेन्ही टाेल नाक्यांवर कार आणि जीपच्या एका फेरीला ७० रुपये द्यावे लागायचे. ३ जूनपासून यासाठी ७५ रुपये द्यावे लागतील. मिनी बससाठी ११५ रुपये द्यावे लागायचे. आता १२० रुपये द्यावे लागणार आहेत. ट्रक आणि बससाठी २४५ रुपये द्यावे लागायचे. आता २५० रुपये द्यावे लागणार आहेत. २४ तासाच्या आत परतीच्या प्रवासाचे दरही १० रुपयांनी महागले आहेत.

साेलापूर ते येडशी महामार्गावर साेलापूर हद्दीत तामलवाडी टाेल नाका आहे. या टाेल नाक्यावर कार आणि जीपसाठी पूर्वी ९५ रुपये द्यावे लागायचे. ३ जूनपासून १०५ रुपये द्यावे लागतील. मिनी बस, ट्रक यांच्या  दरातही पाच रुपयांनी वाढ झाली. साेलापूर अक्कलकाेट, साेलापूर सांगली महामार्गावरील टाेल नाक्यांवरही प्रत्येक पाच रुपयांची वाढ झाली आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाSolapurसोलापूरSangliसांगलीPuneपुणे