तू माझ्याशी फोनवर बोलणार की नाही? म्हणत अल्पवयीन मुलीचा पाठलाग, गुन्हा दाखल
By रूपेश हेळवे | Updated: May 24, 2023 14:59 IST2023-05-24T14:56:01+5:302023-05-24T14:59:33+5:30
पीडित ही १४ वर्षाची असून ती घराकडे जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करत तिला तू माझ्याशी फोनवर बोलणार की नाही? असं म्हणाला.

तू माझ्याशी फोनवर बोलणार की नाही? म्हणत अल्पवयीन मुलीचा पाठलाग, गुन्हा दाखल
सोलापूर - तू माझ्याशी फोनवर बोलणार की नाही? म्हणत अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. खंडू चव्हाण ( रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पीडित ही १४ वर्षाची असून ती घराकडे जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करत तिला तू माझ्याशी फोनवर बोलणार की नाही? असं म्हणाला. त्यावेळी पीडितेने तू माझा पाठलाग का करतो, मी तुला फोनवर बोलणार नाही असं म्हणाली. तरी देखील आरोपी खंडू हा वारंवार तिचा पाठलाग करत होता. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.