शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शॉपिंग सेंटर, मॉल्स वगळता जिल्ह्यात सर्व दुकानांना मिळाली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 14:28 IST

लॉकडाऊनमध्ये सवलती : गॅरेज, प्लंबिंगसह सर्व सेवा सुरू, मॉर्निंग वॉकही करता येणार

ठळक मुद्दे पाच जूनपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता सर्व बाजारपेठा पी १ आणि पी २ या तत्त्वावर सुरू राहतीललोकांच्या वाहतुकीसाठी रिक्षा, चार चाकी, दोन चाकी यांना परवानगी दिलीकपड्यांच्या दुकानांमध्ये ट्रायल रुमच्या वापराला परवानगी दिली जाणार नाही

सोलापूर : जिल्ह्यातील नागरिकांना बुधवार, ३ जूनपासून मोठा दिलासा मिळणार आहे.  दुकाने, रिक्षा, खासगी कार्यालय सुरू करण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नियम व अटी लावून परवानगी दिली आहे. 

बुधवारपासून नागरिकांना पहाटे पाच ते सायंकाळी ५ या कालावधीत फिरण्याची मुभा देण्यात आली आहे. तीन जूनपासून सायकल चालवणे, जॉगिंग, धावणे, मोकळ्या मैदानावर व्यायाम करण्यास परवानगी असेल.  सामूहिक गटाने केलेल्या कार्यास परवानगी नसेल. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल आणि तंत्रज्ञ यांनी नियमांचे पालन करावे. गॅरेज व वर्कशॉपमध्ये वाहनांच्या दुरुस्तीसाठी भेटीची वेळ ठरवून काम करावे. सर्व शासकीय कार्यालयांनी कमीत कमी १५ किंवा १५ टक्के मनुष्यबळाची उपस्थिती ठरवून काम सुरू करावे. जिल्हाधिकाºयांनी आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्यास परवानगी दिली नाही. जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करायला परवानगी दिली आहे.

हे बंद राहीलसर्व शैक्षणिक व प्रशिक्षण देणाºया संस्था, सर्व चित्रपटगृहे, मॉल्स, खरेदी संकुले, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, वॉटरपार्क, मंगल कार्यालये, सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे बंद ठेवली जातील. केश कर्तनालये, स्पा, सलून बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील.

दुकाने सम-विषम तारखेस उघडणार- पाच जूनपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता सर्व बाजारपेठा पी १ आणि पी २ या तत्त्वावर सुरू राहतील. रस्त्याच्या एका बाजूची दुकाने, लेन, पॅसेज विषम तारखेस उघडणे तर दुसºया बाजूची दुकाने सम तारखेस उघडणे या अटीवर खुली राहतील. दुकानांच्या वेळा सकाळी ९ ते सायंकाळी ५ असतील. कपड्यांच्या दुकानांमध्ये ट्रायल रुमच्या वापराला परवानगी दिली जाणार नाही. वस्तू, सामान आदींना परवानगी दिली जाणार नाही. लोकांच्या वाहतुकीसाठी रिक्षा, चार चाकी, दोन चाकी यांना परवानगी दिली आहे. रिक्षा व चारचाकीमध्ये चालका व्यतिरिक्तकेवळ दोघांना परवानगी आहे. दुचाकीवर केवळ एकाला परवानगी आहे. सर्व खासगी कार्यालये आवश्यकतेनुसार दहा टक्के मनुष्यबळासह कार्यरत राहू शकतील. उर्वरित कर्मचारी घरात बसूनच काम करतील.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार