अहमदाबाद - तिरुचिरापल्ली- अहमदाबाद विशेष गाडी, प्रवाशांची होणार सोय.

By रूपेश हेळवे | Published: December 29, 2023 07:17 PM2023-12-29T19:17:42+5:302023-12-29T19:17:57+5:30

या गाडीच्या एकूण दहा फेऱ्या होणार असून यात ५ अप आणि ५ डाऊन फेऱ्या होणार आहेत.

Ahmedabad Tiruchirappalli Ahmedabad special train passengers will be facilitated | अहमदाबाद - तिरुचिरापल्ली- अहमदाबाद विशेष गाडी, प्रवाशांची होणार सोय.

अहमदाबाद - तिरुचिरापल्ली- अहमदाबाद विशेष गाडी, प्रवाशांची होणार सोय.

सोलापूर : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून अहमदाबाद - तिरुचिरापल्ली - अहमदाबाद दरम्यान साप्ताहिक विशेष गाड़ी चालिण्यात येणार आहे. या गाडीचे २८ डिसेंबर पासून ते २८ जानेवारी पर्यंत धावणार आहे. या गाडीच्या एकूण दहा फेऱ्या होणार असून यात ५ अप आणि ५ डाऊन फेऱ्या होणार आहेत.

अहमदाबाद - तिरुचिरापल्ली विशेष एक्सप्रेस- गुरुवार दिनांक २८ डिसेंबर ते २५ जानेवारी २०२४ दरम्यान, अहमदाबाद येथून ९ : ३० वाजता सुटून शनिवार पहाटे ३ : ४५ वाजता तिरुचिरापल्ली येथे पोहचेल. तसेच तिरुचिरापल्ली- अहमदाबाद विशेष एक्सप्रेस- रविवारी दिनांक ३१ डिसेंबर ते २८ जानेवारी २०२४ दरम्यान, तिरुचिरापल्ली येथून सकाळी ५ : ४० वाजता सुटून सोमवारी रात्री ९ : १५ वाजता अहमदाबाद येथे पोहचेल. ही गाडी गेरातपुर, वडोदरा, सुरत, वलसाड, वापी, वसई रोड, वामन रोड, कल्याण, पुणे, सोलापूर, कलबूर्गी, वाडी, रायचूर, मंत्रालयम, गुंतकल जं, ताडीपत्री, कुद्दपह, रेनिगुंता, अरक्कोनं, पेरंबुर, चेन्नई एगमोर, तंब्राम, चेंगल्पत्तू, विल्लुपुरम, कुद्दलुर पोर्ट, चिदंबरम, सिरकाझही, वैठेश्वरांकोईल, मयीलादुठुराई, कुंभकोनं, पप्नसंम आणि थांजवूर या मार्गे जाणार आहे. या गाडील एकूण २२ एलएचबी कोच असून यात एसी टू- १, एसी थ्री-३, स्लीपर १२ , जनरल ४, जेनरेटर कार - १, ब्रेक वान १ डबा असणार आहे. या गाडीसाठी आरक्षण संकेतस्थळावर करता येणार आहे.

Web Title: Ahmedabad Tiruchirappalli Ahmedabad special train passengers will be facilitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.