ताबा सुटल्यानं ट्रक डिव्हायडरला धडकल; एकाचं डोकं फुटलं, दुसऱ्याची पाठ शेकली
By विलास जळकोटकर | Updated: September 18, 2023 19:09 IST2023-09-18T19:09:22+5:302023-09-18T19:09:32+5:30
इंदापूर टोलनाक्याजवळ अपघात : दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार

ताबा सुटल्यानं ट्रक डिव्हायडरला धडकल; एकाचं डोकं फुटलं, दुसऱ्याची पाठ शेकली
सोलापूर : रात्रीच्या वेळी मालट्रक चालवताना वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन थेट डिव्हायडरला धडकल्याने दोघे जखमी झाले. यात एकाचं डोकं फुटलं तर दुसऱ्या पाठिला गंभीर दुखापत झाली. सोमवारी सकाळी दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. इंदापूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाला.
दशरथ बाबासो हजारे (वय- २४, रा. उपळाई रोड, बार्शी) आणि गणेश सीताराम वाघमारे (वय- २१, रा. खांडवी, ता. बार्शाी) अशी जखमींची नावे आहेत.
यातील जखमी दशरथ हजारे व गणेश वाघमारे हे पुण्याहून राहत्या गावाकडे मित्रासमवेत होते. रविवारी मध्यरात्रीनंतर वाहन इंदापूरजवळ आले असताना टोलनाक्याजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी डिव्हायडरला धडकली. यात वरील दोघे जखमी झाले.
जखमींना इंदापूरच्या सरकारी दवाखान्यात नेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले. तेथून डॉक्टरांच्या सल्लाने त्यांना सोमवारी सकाळी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. करण्यात आले आहे. दोघेही शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.