शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

१९ वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही शाळेचे बांधकाम अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 20:48 IST

पुनर्वसित चिंचणीकरांचा संघर्ष : अंगणवाडी भरते ग्रामपंचायत कार्यालयात

ठळक मुद्देपुनर्वसित गावांना दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्याचा नियम नसल्याचे एकमेव कारणआपल्या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी लोकवर्गणी व लोकसहभागातून पुनर्वसित चिंचणी (पिराची कुरोली), ता. पंढरपूर या गावाने शाळेचे बांधकाम सुरूया गावाने शाळेचे बांधकाम सुरू ठेवत प्रशासनाला चपराक दिली

पटवर्धन कुरोली : सन १९९८ साली निधीअभावी बंद पडलेले शाळेचे बांधकाम तब्बल १९ वर्षे पाठपुरावा, मागणी करूनही सुरू झालेच नाही. यासाठी पुनर्वसित गावांना दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्याचा नियम नसल्याचे एकमेव कारण देण्यात आले. मात्र, तरीही ग्रामस्थांनी खचून न जाता ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ याप्रमाणे आपल्या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी लोकवर्गणी व लोकसहभागातून पुनर्वसित चिंचणी (पिराची कुरोली), ता. पंढरपूर या गावाने शाळेचे बांधकाम सुरू ठेवत प्रशासनाला चपराक दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील कन्हेर धरणाच्या निर्मितीनंतर चिंचणी या गावाने महाबळेश्वरच्या कुशीतून पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोलीच्या माळरानावर विस्थापित झाले. त्यावेळी धरणग्रस्तांना घरे बांधून देत असताना शाळेच्या बांधकामाचे कामही सुरू होते. मात्र, धरणग्रस्तांच्या जाचक अटींमुळे ठेकेदाराला बिले काढण्यास अडचणी निर्माण होत असल्याने वैतागलेल्या ठेकेदाराने १९९८ साली सुरू असलेले झेडपी शाळेचे काम त्याचवेळी अर्धवट अवस्थेत सोडले.  १९ वर्षे शाळेचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असूनही प्रशासनाने त्या ठेकेदाराला ना जाब विचारला, ना त्याच्यावर कारवाई केली. मात्र, विस्थापित झालेल्या चिंचणीकरांना शिक्षणासाठी मात्र संघर्षच करावा लागला.

विस्थापित झालेल्या चिंचणीमध्ये पहिली ते चौथीचे वर्ग भरतात. वर्गखोल्यांअभावी एका खोलीत दोन वर्ग भरविण्याची  नामुष्की शिक्षण विभागावर येत आहे. तब्बल १९ वर्षे या शाळेचे बांधकाम पूर्ण व्हावे, यासाठी सामान्य प्रशासन पुनर्वसन प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी, पाठपुरावा करूनही अर्धवट शाळा, शाळा दुरुस्ती यासाठी निधी उपलब्ध करण्याची तरतूदच   नियमात नसल्याचे एकमेव कारण विस्थापित चिंचणीकरांना ऐकावयास मिळाले. प्रशासन कोणतीही जबाबदारी घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी नाउमेद न होता अनेकांना मदतीचे आवाहनही केले. मात्र, आवश्यक मदत मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आमच्या               गावात आम्हीच सरकार म्हणत रडत न बसता लोकसहभाग व लोकवर्गणीतून अर्धवट शाळेच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. बघता बघता शाळेचे बांधकाम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

अंगणवाडी भरते ग्रामपंचायत कार्यालयात- जिल्हा परिषद शाळेसाठी ग्रामस्थांनी तब्बल १९ वर्षे संघर्ष केल्यानंतरही त्यांना हक्काच्या खोल्या मिळाल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी श्रमदानातून, लोकवर्गणीतून शाळेचे बांधकाम पूर्ण करण्याचा निश्चय केला. त्यानंतर अंगणवाडीसाठीही ग्रामस्थांचा संघर्ष सुरूच असून अंगणवाडीला स्वतंत्र इमारत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयात अंगणवाडी भरवत मुलांना शिक्षण देण्यासाठी पालकांची धडपड सुरू आहे.

शाळा खोल्यांसाठी आम्ही मदतीचे आवाहन केल्यानंतर रोटरी क्लब पंढरपूर, पिराची कुरोली ग्रामपंचायत व काही जणांनी मदतीसाठी पुढे येत मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, आणखी सुविधांसाठी निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी काही दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे. शासनानेही जाचक अटी शिथिल करत मदत केल्यास आमची मुले गावातील हक्काच्या शाळेत  शिकतील. - मोहन अनपट, जिल्हाध्यक्ष, श्रमिक मुक्तीदल

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळाgovernment schemeसरकारी योजना