शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

Waterday; डब्लूएचओच्या नियमाप्रमाणे ११ टप्प्यात व्हावे उजनीच्या पाण्याचे शुद्धीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:00 IST

पाणी जितके प्रदूषणमुक्त असायला हवे तितके होत नाही; पाण्यातील टीडीएसमुळे आरोग्याचा प्रश्न

ठळक मुद्देउजनी धरणातील पाण्याचा टीडीएस ८५० ते ९०० आहेकोयना धरणाचा टीडीएस १५० ते २०० दरम्यान आहेपिंपरी येथील प्रदूषित पाणी उजनी धरणात येत असल्याने या पाण्याची अशी अवस्था

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान समजले जाते. या पाण्यामुळे शहर तसेच इतर भागातील नागरिकांची तहान भागविली जाते. ही तहान भागविली जात असताना पाणी जितके प्रदूषणमुक्त असायला हवे तितके होत नाही. 

पाणी प्रदूषित करणारे घटक जावे यासाठी ११ ते १२ टप्प्यामध्ये शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनने हा नियम सांगितला आहे. आपल्याकडे सात टप्प्यामध्ये शुद्धीकरण होते. त्यामुळे पाण्यातील प्रदूषित घटक काही प्रमाणात तसेच राहतात. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील पळसदेव, अगोली आदी गावांत मात्र अशी परिस्थिती नाही. या गावामध्ये उत्कृष्ट दर्जाचे जलशुद्धीकरण प्रकल्प उभे करण्यात आले आहे. या पद्धतीचे जल शुध्दीकरण प्रकल्प सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील उभे करणे गरजेचे आहे.कुरकुंभ एमआयडीसी येथून मोठ्या प्रमाणात रसायने उजनी धरणातील पाण्यात मिसळतात. याचा परिणाम या पाण्यावर होतो. उजनी धरण परिसरातील गावातील जनावरे थेट पाणी पित असल्याने त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाले आहेत. तसेच या पाण्याचा परिणाम शेतीवरही झाला आहे.

जलाशयातील वनस्पती तसेच इतर जलचरांवरही परिणाम होत आहे. मच्छीमारीसाठी पाण्यात उतरल्यानंतर पायाला खाज सुटत आहे. या प्रकारच्या ़अनेक तक्रारी मच्छीमारांनी केल्या.

पाण्याची शुद्धता मापण्यासाठी टीडीएसचा स्तर

  • - शहरात होणाºया पाणीपुरवठ्यावरही याचा परिणाम आरोग्यावर झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये किडनी स्टोनसारखे आजार वाढण्याची शक्यता आहे. तसेच पोटाचे विकारही वाढतात. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी त्यांच्या आरोग्यावर अधिक  दूरगामी परिणाम होऊ शकतो.
  • - पिण्याच्या पाण्याची शुद्धता मापून पाहण्याकरिता टीडीएस (टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स ), पीएच स्तर आणि पाण्याचा खारेपणा पाहिला जातो. 

पाण्यामध्ये होणारे प्रदूषण टाळण्यासाठी रासायनिक घटक मिसळू नयेत याची प्रथम काळजी घ्यायला हवी. प्रशासनाने पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर गावागावांमध्ये शुद्धीकरण प्रकल्प उभे करावे. याद्वारेच डब्लूएचओच्या मापदंडानुसार आपण पाणीपुरवठा करु शकतो.- डॉ. जी. एस. कांबळे, संचालक, सामाजिक शास्त्रे संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूऱ

उजनी धरणातील पाण्याचा टीडीएस ८५० ते ९०० आहे. कोयना धरणाचा टीडीएस १५० ते २०० दरम्यान आहे. पुणे, दौंड, पिंपरी येथील प्रदूषित पाणी उजनी धरणात येत असल्याने या पाण्याची अशी अवस्था आहे. त्या ठिकाणावरील पाण्यावर प्रक्रिया करुन पुढे सोडणे हा चांगला उपाय आहे.- विलास लोकरे, अध्यक्ष, सीना-भीमा संघर्ष समिती

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीwater pollutionजल प्रदूषण