Accidents near Tambhurni; Two people died on the spot in Ausa | टेंभुर्णीजवळ अपघात; औसा येथील दोघांचा जागीच मृत्यू
टेंभुर्णीजवळ अपघात; औसा येथील दोघांचा जागीच मृत्यू

ठळक मुद्दे- अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीसांनी दिली घटनास्थळाला भेट- अपघातातील मयतांची नावे अद्याप पोलीसांना समजू शकली नाहीत- अज्ञात वाहनांच्या धडकेत अपघात झाल्याची प्राथमिक नोंद

सोलापूर : लातूरहुन पुण्याकडे जात असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली़ या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे़ ही घटना सोलापूर-पुणे महामार्गावरील शिराळ (टें़ ता़ माढा) येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली़ याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

याबाबत टेंभुर्णी पोलीसांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील औसा येथील युवक सोलापूरमार्गे पुण्याला निघाले होते़ मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावरील टेंभुर्णी परिसरात असलेल्या शिराळ (टें) गावाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली़ या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला़ याच अपघात अन्य एक जण जखमी झाले असून त्यांच्यावर इंदापुर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ अपघातात ठार झालेल्यांची अद्याप ओळख पटलेली नाही, मात्र मोबाईलवर आलेल्या कॉलवरून ते लातूर जिल्ह्यातील औसा येथील रहिवासी आहेत अशी माहिती पोलीसांनी दिली़ 


 

Web Title: Accidents near Tambhurni; Two people died on the spot in Ausa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.