शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

अकोले बु येथे अपघात, दोन युवक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:24 PM

जखमींना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. बराच वेळ ते दोघेही अपघातस्थळी पडून होते

ठळक मुद्देअपघाताची फिर्याद सुरेश ज्ञानेश्वर माने यांनी दिली सागर शरद माने व सुहास शिंदे हे दोघे शेतीविषयक औषधांच्या कंपनीत काम करीत होते

पंढरपूर/टेंभुर्णी : टेंभुर्णी-पंढरपूर रोडवरील अकोले बु. (ता. माढा) येथे कार व मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात वाखरी (ता. पंढरपूर) येथील दोन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना वाखरी परिसरात घडली.

सागर शरद माने (वय २६) आणि त्याचा मित्र सुहास दादासाहेब शिंदे (वय २८, दोघे रा. वाखरी, ता. पंढरपूर) अशी अपघातात मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत. सागर शरद माने व सुहास शिंदे हे दोघे त्यांच्याकडील मोटरसायकल (क्र. एम. एच. १३/ सी.डब्लू. १४७८) वरून पंढरपूरला निघाले होते. ते अकोले बु. येथे आले असता त्यांच्या मोटरसायकलला समोरून येणाºया कार (क्र. एम.एच. १३/ ए.झेड. ८९१६)ने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात माने हा जागीच ठार झाला तर शिंदे हा अकलूजकडे उपचारास घेऊन जाताना वाटेत मयत झाला. अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोहेकॉ. दिलीप केंगार व पोकॉ. भोये यांनी घटनास्थळी भेट दिली. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

अपघाताची फिर्याद सुरेश ज्ञानेश्वर माने यांनी दिली असून, कारचालक रणजित राजू बुधनेर (रा. नारायण चिंचोली, ता. पंढरपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोहेकॉ. दिलीप केंगार करीत आहेत.

उपचाराला विलंब- जखमींना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. बराच वेळ ते दोघेही अपघातस्थळी पडून होते. यानंतर त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले. सागर शरद माने व सुहास शिंदे हे दोघे शेतीविषयक औषधांच्या कंपनीत काम करीत होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसAccidentअपघात