आजीच्या अस्थिविसर्जनासाठी निघालेल्या दोघांचा अपघातात मृत्यू; मंगळवेढ्याजवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 12:51 IST2021-07-24T12:45:55+5:302021-07-24T12:51:27+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Accidental death of two who went for grandmother's autopsy; Incident near Mars | आजीच्या अस्थिविसर्जनासाठी निघालेल्या दोघांचा अपघातात मृत्यू; मंगळवेढ्याजवळील घटना

आजीच्या अस्थिविसर्जनासाठी निघालेल्या दोघांचा अपघातात मृत्यू; मंगळवेढ्याजवळील घटना

सोलापूर : सोलापूर मंगळवेढा महामार्गावर टेम्पो दुचाकीची समोरासमोर धडक झाली या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. 

मंगळवेढा - सोलापूर रोडवर असलेल्या दामाजी साखर कारखान्याच्या पाटीजवळ आजीचे अस्थिविसर्जन करण्यासाठी जात असताना दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या धडकेने नंदेश्वर (तालुका मंगळवेढा) येथील दोघेजण जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. 

Web Title: Accidental death of two who went for grandmother's autopsy; Incident near Mars