माढा कोर्टातील कामकाजानिमित्त निघालेल्या तरुण वकिलाचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 16:09 IST2024-01-01T16:07:40+5:302024-01-01T16:09:15+5:30

कोर्टात पक्षकारांच्या कामकाजानिमित्त निघालेल्या एका तरुण वकीलाचा कुर्डूवाडी माढा रस्त्यावर भोसरे हद्दीत दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

Accidental death of a young lawyer on his way to Madha court in solapur | माढा कोर्टातील कामकाजानिमित्त निघालेल्या तरुण वकिलाचा अपघाती मृत्यू

माढा कोर्टातील कामकाजानिमित्त निघालेल्या तरुण वकिलाचा अपघाती मृत्यू

लक्ष्मण कांबळे,माढा: कोर्टात पक्षकारांच्या कामकाजानिमित्त निघालेल्या एका तरुण वकीलाचा कुर्डूवाडी माढा रस्त्यावर भोसरे हद्दीत दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाला.यात अरुण परमेश्वर बोडरे (वय ४१ रा.बादलेवाडी ता.माढा) असे अपघातात मयत झालेल्या वकीलाचे नाव आहे. ही घटना सोमवारी दिनांक १ जानेवारी रोजी दुपारी बारा- साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की ॲड.अरुण बोडरे हे त्यांची शाईन क्रमांक एमएच-४५,एव्ही-८०१२ दुचाकीवरुन बादलेवाडी ता.माढा येथील घरातून कुर्डूवाडी मार्गे माढा कोर्टाकडे जात असताना कुर्डूवाडी - माढा रोडवर भोसरे हद्दीत बुलेट क्रमांक एमएच-४५,एएस-१७७७ या या दोन्ही गाड्यांमध्ये झालेल्या जोराच्या धडकेत शाईन गाडीवरील अरुण बोडरे या वकीलचा उपचारापूर्वी मृत्यू  झाला. घटनास्थळावर रस्त्याच्या बाजूला हेलमेट पडलेले होते, तर एका गाडीचा बंपर तुटलेला होता.मयत ॲड.बोडरे यांच्या पश्चात आई,वडिल,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी ,दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.

या घटनेची माहिती समजतात माढा कोर्टातील सर्व सहकारी वकिलांनी ग्रामीण रुग्णालयात मयत वकिलाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती समजतात त्याचा भाऊ ग्रामीण रुग्णालयात पोहोचला व समोर मयत भावाला पाहताच त्याने एकच हांबरडा फोडला, त्यानंतर नातेवाईकांनीही मयताला पाहण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.

Web Title: Accidental death of a young lawyer on his way to Madha court in solapur