शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या अपघाती विम्याची कागदपत्रे देण्यास गेलेल्या जवानाचे अपघाती निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 17:07 IST

उमेश सानप हे वडिलांच्या वैद्यकीय उपचारावरील विमा कागदपत्रांची फाईल जमा करण्यासाठी गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी मुंबईहून पुण्याला आले होते

सोलापूर - बार्शी तालुक्यातील उक्कडगावचे सुपुत्र आणि भारतीय नौदल सेवेत कार्यरत असलेले जवान अनिल सुनिल सानप यांचे अपघाती निधन झाले. पुणे-मुंबई एक्सप्रवेस महामार्गावरुन ते प्रवास करत असलेल्या खासगी वाहतुकीच्या एर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये, त्यांचे दुर्दैवी निधन झाले. ते ३० वर्षांचे होते. या घटनेनं गावावर शोककळा पसरली असून बार्शीसह मित्रपरिवारानेही शोक व्यक्त केला. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी मूळ गावी उक्कडगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी आणि ५ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. 

अनिल सानप हे वडिलांच्या वैद्यकीय उपचारावरील विमा कागदपत्रांची फाईल जमा करण्यासाठी गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी मुंबईहून पुण्याला आले होते. मात्र, पुण्याहून परत जाताना ते प्रवास करत असलेल्या गाडीचा अपघात होऊन त्यांचे दुर्दैवी निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचा अपघात झाला होता. तेव्हा, त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू होते. त्यावेळी, सुनिल हे मुंबईतून येऊन वडिलांची काळजी घेत. दुर्दैवाने वडिलांच्या विमा अपघाताची कागदपत्रे देण्यासाठी आल्यानंतर अपघातातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. उमेश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी नौदल जवानांचे पथक आज उक्कडगाव येथे आले होते. तसेच, बार्शीचे तहसिलदार आणि अनिल यांचा मित्र परिवारही जमला होता. मानवंदना देत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावार अंत्यसंस्कार करण्यात आले. 

शालेय व माध्यमिक शिक्षण बार्शीतच

अनिल सानप यांचे प्राथमिक शिक्षण पांगरीत झाले असून खामगांव येथील आश्रम शाळेत त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले होते, त्यानंतर, श्रीमान झाडबुके महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. दरम्यान, सन २०११ मध्ये ते भारतीय नौदलात भरती झाले होते. गेल्या १० वर्षांपासून ते भारतीय नौदलाच्या सेवेत कार्यरत होते.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील उतारावर किमी 37 जवळ गुरुवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास एका कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. एक महिला या अपघातात सुदैवाने वाचली आहे. या मृत्युमुखी पडलेल्या ५ जणांमध्ये उमेश सानप हे नौदलातील जवान होते. 

टॅग्स :SoldierसैनिकSolapurसोलापूरAccidentअपघातPuneपुणे