Accidental death of four, including a couple who ran away from home and got married | घरातून पळून जाऊन प्रेमविवाह करणाºया प्रेमी युगूलासह चौघांचा अपघाती मृत्यू

घरातून पळून जाऊन प्रेमविवाह करणाºया प्रेमी युगूलासह चौघांचा अपघाती मृत्यू

बार्शी : बार्शीतून भाड्याने कार घेऊन निघालेल्या प्रेमी युगूलासह चौघांवर काळाने झडप घातल्याने जीव गमावावा लागला. हे युगूल घरातून पळून जाऊन प्रेमविवाह करण्यासाठी बेंगलोर येथे निघाले होते. यात कळंबची मुलगी, येरमाळ्याचा मुलगा, बार्शीतील कारचालक प्रदीप बनसोडे, त्याचा मित्र संदीप कांबळे या कारमधील चौघांना वाळूच्या ट्रकने उडवल्याने ते ठार झाले. अल्पवयीन मुलगी उपचार चालू असताना सोमवारी मयत झाल्याची घटना घडली.

यातील अपघातग्रस्त कार बार्शीतली असून मृतामध्ये एक बार्शीतील तर एक येरमाळ्याचा तर दोघे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील रहिवाशी आहेत. 

बार्शीतील कारचालकावर मंगळवारी अत्यसंस्कार करण्यात आले.  यातील मयत  प्रकाश बनसोडे हा  संभाजी नगर, बार्शी येथील रहिवाशी असून आपल्या कारमधून भाड्याने  प्रवाशी वाहतूक करत असे. मयत झालेला त्याचा मित्र संदीप कांबळे याने त्यास कळंब तालुक्यातून बंगलोरला जाण्याचे भाडे आणले होते. 

त्यात एक युवक व सोबत  अल्पवयीन मुलीला बेंगलोर येथे प्रेमविवाहासाठी जाण्यासाठी भाडे त्यांनी स्वीकारले होते.  प्रवास लांबचा  असल्याने तो मयत संदीप हाही बदली चालक म्हणून बनसोडे यांच्यासोबत  गेला होता. काळाने या चौघांवर झडप घातल्याने त्यांना मरणाच्या दाढेत जावे लागले. 

Web Title: Accidental death of four, including a couple who ran away from home and got married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.