पंढरपूरकडे येणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2022 04:08 AM2022-07-10T04:08:28+5:302022-07-10T04:08:54+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Accident to devotees coming to Pandharpur; Two killed, three seriously injured | पंढरपूरकडे येणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर

पंढरपूरकडे येणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर

googlenewsNext

पंढरपूर : कर्नाटकातील बेळगावमधील अंनगुळ येथील पाच भाविक सेल्टोस गाडीने पंढरपूरकडे येत असताना रविवारी पहाटे कासेगाव फाटा ( ता. पंढरपूर) येथे अपघात झाला. या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.

या अपघातात अभिजीत हुंबरे (वय २८, रा. अंनगुळ ता. बेळगाव), गीतेश पोकंशेकर (वय २६, रा. अंनगुळ ता. बेळगाव), राजकवि कृष्णा मधुकर (वय २३, रा. अंनगुळ ता. बेळगाव) हे भाविक जखमी झाले आहेत. तर राजू संभाजी शिधोळकर (वय ४५, रा. अंनगुळ, ता. बेळगाव), परशुराम संभाजी जवरूचे (वय ५० रा. अंनगुळ ता. बेळगाव) हे भाविक मयत झाले आहेत. मयत भाविकांबाबत त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आले आहेत. तसेच जखमी भाविकांवर पंढरपूर येथील  खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Accident to devotees coming to Pandharpur; Two killed, three seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.