सोलापूर-विजयपूर रोडवर अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 19:00 IST2019-02-16T18:57:32+5:302019-02-16T19:00:01+5:30
सोलापूर : सोलापूर -विजयपूर महामार्गावरील ए़ जी़ पाटील महाविद्यालयसमोर अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वारावरील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ...

सोलापूर-विजयपूर रोडवर अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुण ठार
सोलापूर : सोलापूर-विजयपूर महामार्गावरील ए़ जी़ पाटील महाविद्यालयसमोर अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वारावरील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली.
ओंकार शिवानंद मेहता (वय २३ रा. ए - २ सिद्धेश्वर नगर विजापूर रोड, सोलापूर), सचिन विश्वनाथ याळगी (वय २५ रा. बेघर हौसिंग सोसायटी विजापूर रोड सोलापूर) असे ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. दोघे मोटारसायकल ( क्र. एम. एच- १३ सीसी - ३०३ वरून विजापूर रोड मार्गे सोलापूर कडे येत होते.
एसआरपी कॅम्प जवळील काका हॉटेल समोर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली़ या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले. दोघांना विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक चव्हाण यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. सिव्हिल पोलिस चौकीत याची नोंद झाली आहे.