सोलापूरच्या प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला भिगवणजवळ अपघात; अव्वल कारकूनाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 18:58 IST2022-07-20T18:58:19+5:302022-07-20T18:58:38+5:30
अव्वल कारकून उमेश वैद्य (वय ४८, रा. मोहित नगर, सोलापूर) असे मयताचे नाव असून व राजकुमार वाघमारे, असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.

सोलापूरच्या प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला भिगवणजवळ अपघात; अव्वल कारकूनाचा जागीच मृत्यू
सोलापूर- शासकीय कामकाजासाठी पुण्याला निघालेल्या प्रांताधिकारी नंबर दोन यांच्या वाहनाला भिगवण जवळ अपघात झाला. या अपघातात एका अव्वल कारकूनाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरे अव्वल कारकून गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी सकाळच्या सुमारास झाला.
अव्वल कारकून उमेश वैद्य (वय ४८, रा. मोहित नगर, सोलापूर) असे मयताचे नाव असून व राजकुमार वाघमारे, असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. दोघेही मंगळवारी सकाळी Mh13 BQ0097 या प्रांताधिकारी क्रमांक दोन यांच्या वाहनातून शासकीय कामकाजासाठी पुण्याला गेले होते.
दरम्यान ते भिगवण जवळ गेले असता त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला, कंटेनरची धडक झाली, त्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. मात्र उपचार सुरू असताना उमेश वैद्य यांचा मृत्यू झाला.
दरम्यान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या अपघाताची माहिती मिळताच इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना संपर्क केला. त्यांच्यावर इंदापूर या ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने या वाहनांमध्ये प्रांताधिकारी सुमित शिंदे नव्हते.