शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षामुळेच अपघात

By admin | Updated: July 6, 2014 00:18 IST

नीलम गोऱ्हे ; पंढरपूर येथे पत्रकार परिषद

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रमुख दिंड्यांकडेच शासनाचे लक्ष असते; अन्य छोट्या दिंड्यांना शासन सुरक्षा देत नसल्याने भाविकांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. शनिवारी पंढरपूर दौऱ्यावर आल्या असता पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या़आढीव (ता. पंढरपूर) येथील विसाव्याजवळ अमरावतीवरून पायी आलेल्या दिंडीत कार घुसल्याने जखमी झालेल्या वारकऱ्यांना पाहण्यासाठी गोऱ्हे पंढरपूरला आल्या होत्या. यावेळी जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, तालुकाप्रमुख संभाजी शिंदे, शहरप्रमुख संदीप केंदळे, शहर उपप्रमुख ओंकार बसवंती उपस्थित होते. आषाढी यात्रेसाठी अनेक दिंड्या येत असतात. सोलापूरचा हाय-वे बनवताना पालख्यांसाठी एक ट्रॅक बनवला असता तर वारकऱ्यांची सोय झाली असती. यात्रा कालावधीनंतर तो ट्रॅक दुचाकी सायकल व मोटरसायकलवाल्यांना वापरता आला असता. आषाढी यात्रा ही प्रत्येक वर्षी असते. यात्रेचे वेळापत्रक हे फार पूर्वीच जाहीर होते़ तरीही शहरातील महत्त्वाची कामे पूर्ण होत नाहीत. ऐन यात्रा कालावधीतच कामे घाईघाईने केली जातात. यावरून विभागीय आयुक्त निष्क्रियच आहेत, असेही त्या म्हणाल्या.पंढरपूर, शिर्डी, जेजुरी व अन्य ज्या ठिकाणी देवस्थाने आहेत त्या ठिकाणी नगरपालिका व मंदिर मिळून विकास आराखडा तयार केल्याने तेथे विकास झाला आहे. पंढरीतही नगरपालिका व मंदिर समितीने समन्वय साधून विकास केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. -------------------------------शौचालये खराबआषाढी यात्रेत स्वच्छता रहावी यासाठी उच्च न्यायालयाने पंढरीत ४५०० शौचालये बांधण्याचे आदेश दिले. यात्रेपूर्वी शौचालयांची सोय व्हावी, यासाठी तरटांचे शौचालय बांधण्याचे काम सुरू आहे. परंतु ही शौचालये ५ ते ७ वेळा वापरल्यास खराब होतील, असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.