शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

अबब...दहा गुंठ्यात ४४ टनांचा तीस फुटी ऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 13:08 IST

सोगावमधील सरडेंची यशोगाथा : कोथिंबिरीच्या आंतरपिकानेही दिले ५० हजारांचे उत्पादन

ठळक मुद्देसरडे कुटुंब एक सामान्य शेतकरी कुटुंब आहे, यापूर्वी आमच्या कुटुंबाने एकरी १५० टन ऊस उत्पादन घेतले आंतरपीक म्हणून कोथिंबीर हे पीक घेतले़ त्यातून २३ दिवसांत एकरी १० हजार पेंढ्या उत्पादन मिळाले़आज एक एकरात १७६ टन ऊस निघाला आहे, यात साडेचार लाखांचे उत्पन्न मिळाले

नासीर कबीरकरमाळा : तालुक्यात सोगाव (पू.) येथील युवा शेतकरी ब्रह्मदेव सरडे यांनी २६५ जातीच्या आडसाली उसाचे फक्त १० गुंठे क्षेत्रात तब्बल ४४ टन ऊस उत्पादन घेतले. या हिशेबाप्रमाणे विक्रमी एकरी १७६ टन ऊस उत्पादन निघाले. त्यांनी वेगवेगळ्या प्रयत्नातून  हा प्रयोग यशस्वी केला आहे. भविष्यात ५ एकर क्षेत्रात हा प्रयोग करण्यात येणार आहे. उसाचे वजन कमीत कमी ३ किलो व जास्तीत जास्त ४.५ किलो अशी गुणवत्ता पाहायला मिळाली.

प्रारंभी जमिनीचे माती परीक्षण केले़ जमिनीची उभी व आडवी दीड फूट खोलीपर्यंत नांगरट केली़ रुंद सरी पद्धत अवलंबून ठिबक सिंचनाचा वापर केला़ उसावर स्प्रे, एक डोळा बेणे लागवड केली़ स्वत:च्या बेणे मळ्यातील कोवळे, जाड, रसरशीत, निरोगी बेण्यांचा वापर केला़ जैविक, सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर योग्य प्रमाणात केला़ जैविक व रासायनिक बेणे प्रक्रिया, सबसोईलरचा वापर केला.

मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव्ये, सिलिकॉनचा वापर केला़ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (बु) पुणे, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, कृषी विज्ञान कें द्र, कृषी विभागमधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले़ कमीत कमी खर्च करून जास्तीत-जास्त ऊस उत्पादन मिळाले़ आज एक एकरात १७६ टन ऊस निघाला आहे. यात साडेचार लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

कोथिंबिरीचे आंतरपीक - आंतरपीक म्हणून कोथिंबीर हे पीक घेतले़ त्यातून २३ दिवसांत एकरी १० हजार पेंढ्या उत्पादन मिळाले़ पाच रुपये पेंढीप्रमाणे ५० हजार रुपये मिळाल़े त्या भांडवलातून खतांचा व इतर सर्व खर्च भागविला. संडे फार्मर ते विक्रमी ऊस उत्पादक शेतकरी असा त्यांचा प्रवास सुरू आहे. २०० व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप, फेसबुक, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, फोन कॉलिंग, ऊसपीक चर्चासत्रे, कृषी प्रदर्शन, ऊसपीक कार्यक्रम आदींच्या माध्यमातून शेतकºयांना मोफत मार्गदर्शन करतात. 

सरडे कुटुंब एक सामान्य शेतकरी कुटुंब आहे़ यापूर्वी आमच्या कुटुंबाने एकरी १५० टन ऊस उत्पादन घेतले आहे़ याची दखल घेऊन दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, गोवा, सोलापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल ३४ कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ऊस शेतीतील सर्व कामे आई, स्वत: मी व पत्नीच्या मदतीने करुन घेतली़- ब्रह्मदेव सरडे, ऊस उत्पादक, सोगाव (पू) 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने