सोलापूर : छातीत हत्यार खुपसून तरूणाचा भर दिवसा खून

By रूपेश हेळवे | Updated: October 3, 2022 12:31 IST2022-10-03T12:30:33+5:302022-10-03T12:31:05+5:30

सोमवारी सकाळी घडली घटना.

A young man was killed in broad daylight by stabbing a weapon in his chest | सोलापूर : छातीत हत्यार खुपसून तरूणाचा भर दिवसा खून

सोलापूर : छातीत हत्यार खुपसून तरूणाचा भर दिवसा खून

सोलापूर : शहरानजीक असलेल्या तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगामधील शीख शिकलगार वस्तीमध्ये सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास तरुणाच्या छातीत हत्यार खुपसून खून केल्याची घटना घडली. रविसिंग सिसपालसिंग टाक (वय २२, रा. तळे हिप्परगा ) असे मयत तरूणाचे नाव आहे.

मयत रविसिंग आणि शेजारील राहणाऱ्या आरोपीचे गेल्या काही दिवसापासून वाद सुरू होते. या वादातून शेजारील आरोपीने टाक याच्यावर शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले. यामुळे त्याला नातेवाईकांनी उपचारासाठी लगेच छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले, अशी माहिती मयत रविसिंगचा भाऊ जगबीरसिंग टाक याने दिली. घटनेनंतर संशयित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. घटनेनंतर नातेवाईकांनी हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी केली होती.

Web Title: A young man was killed in broad daylight by stabbing a weapon in his chest