मैत्रिणीच्या घरी थांबलेल्या महिलेने रोकडसह दागिने पळवले; घटनेनं परिसरात उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 17:31 IST2025-01-24T17:31:29+5:302025-01-24T17:31:50+5:30

आरोपी महिलेस फोन करून विचारणा केली असता या विषयावर आपण नंतर बोलू असे म्हणून तिने फोन कट केला. 

A woman staying at her friends house stole cash and jewelry | मैत्रिणीच्या घरी थांबलेल्या महिलेने रोकडसह दागिने पळवले; घटनेनं परिसरात उडाली खळबळ

मैत्रिणीच्या घरी थांबलेल्या महिलेने रोकडसह दागिने पळवले; घटनेनं परिसरात उडाली खळबळ

सांगोला : घरात भांडण झाल्याचे कारण सांगून नात्यातील महिलेच्या घरी आसऱ्याला थांबलेल्या नात्यातील महिलेने घरातून पर्समध्ये ठेवलेल्या रोख १० हजार रुपयांसह सोन्याचे गंठण लंपास केले. ही घटना १८ नोव्हेंबर २०२४ रोजी वाकीघेरडी ता. सांगोला येथे घडली होती. याबाबत, नंदाबाई भागवत वाघमारे (रा.शिवाजीनगर), सांगोला हिने मैत्रीण मंदा अनिल आठवले (रा. वाकी घेरडी ता. सांगोला) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी, घरी असताना वाणीचिंचाळे येथील नात्यातील आरोपी महिलेने येऊन १० हजारांसह पर्समधील १ तोळे सोन्याचे मिळाले गंठणही नाही. माझ्या घरी भांडण झाले आहे मी तुमच्याकडे राहते म्हणून फिर्यादीच्या घरी थांबली होती. फिर्यादी नेहमीप्रमाणे सकाळी ७:३० च्या सुमारास कामावर गेली होती. रात्री घरी आल्यानंतर पाहिले असता घरातील १० हजार रुपयांसह पर्समधील १ तोळे सोन्याचे गंठण ही मिळून आले नाही. म्हणून तिने आरोपी महिलेस फोन करून विचारणा केली असता या विषयावर आपण नंतर बोलू असे म्हणून तिने फोन कट केला. 

दरम्यान, तद्नंतर फिर्यादीने मंदा हिला पैसे व सोन्याबद्दल विचारणा केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे देऊन आजतागायत परत देण्यास टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: A woman staying at her friends house stole cash and jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.