Solapur | महावीर चौकात ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 23:29 IST2022-12-25T23:26:03+5:302022-12-25T23:29:52+5:30

रस्त्यावर विखुरला ऊस, सुदैवाने अनर्थ टळला

A tractor transporting sugarcane overturned at Mahaveer Chowk | Solapur | महावीर चौकात ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी

Solapur | महावीर चौकात ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी

विलास जळकोटकर, सोलापूर: सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेला ट्रॅक्टर महावीर चौकात अचानक पलटी झाला यामुळे सबंध ऊस रस्त्यावर विखुरला गेला यामुळे अर्धा तास वाहतूक खोळंबली. ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

मिळालेली अधिक माहिती अशी की ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर हा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे निघाला होता महावीर चौक पार करीत असताना अचानक तो पालथा झाला याच दरम्यान गांधीनगर कडे निघालेल्या एक दुचाकी स्वार एक कार आणि रिक्षा थोडक्यात बचावले यातील एका तरुणास किरकोळ दुखापत झाली आहे त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले आहे.

Web Title: A tractor transporting sugarcane overturned at Mahaveer Chowk