देवदर्शन करून परत निघालेल्या भाविकांच्या जीपला टँकरची धडक; सहा भाविकांचा मृत्यू
By Appasaheb.patil | Updated: June 30, 2023 17:42 IST2023-06-30T17:41:18+5:302023-06-30T17:42:11+5:30
अक्कलकोटजवळील अपघात

देवदर्शन करून परत निघालेल्या भाविकांच्या जीपला टँकरची धडक; सहा भाविकांचा मृत्यू
सोलापूर : शिरवळवाडी (अक्कलकोट) येथे जीप आणि टॅकरचा अपघातात सहा भाविक ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
दरम्यान या अपघातात जखमी झालेल्या उर्वरित सहा ते सात जखमींना अक्कलकोटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार देवदर्शनकडून करून गावाकडे जात असताना भीषण अपघात झाला आहे. अपघातातील सर्वजण कर्नाटकातील अणूर (ता.आळंद) गावचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच अक्कलकोटचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी झाले आहेत.