नववीतील मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या
By रूपेश हेळवे | Updated: November 20, 2022 19:05 IST2022-11-20T19:05:17+5:302022-11-20T19:05:44+5:30
नववीमधील मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नववीतील मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या
सोलापूर : नववीमधील मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवी वसंत कोकरे ( वय १४, रा. भारतमाता नगर, शेळगी) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. वैष्णवी कोकरे हिने राहत्या घरात नॉयलॉन दोरीच्या सहाय्याने छताच्या फॅनला गळफास घेतला. ही घटना शनिवारी रात्री घडली. घटनेच्यावेळी आई ही घरातच होती पण ती बाहेर शेजाऱ्यांशी बोलत बसली होती. त्यावेळी वैष्णवी ही एका खोलीत अभ्यासासाठी बसली होती. त्याच वेळी ही घटना उघडकीस आली. ही घटना कळताच आई वडिलांना काय करावे हे सुचेनासे झाले. त्यांनी आरडा ओरड करत रडण्यास सुरूवात केल्यानंतर शेजारील लोकांना धाव घेतली अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
दरम्यान, घटना कळताच एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक राजन माने, हेड कॉन्सटेबल डी. जी. नवले हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.