गरम दुधाचं भांड अंगावर पडून दीड वर्षाची चिमुकली भाजली
By विलास जळकोटकर | Updated: March 30, 2024 16:56 IST2024-03-30T16:56:47+5:302024-03-30T16:56:57+5:30
धुमेरा आमीर पटेल (वय- दीड वर्षे, रा. केशव नगर, मौलाली चौक, सोलापूर) असे या भाजलेल्या चिमुकलीचे नाव आहे.

गरम दुधाचं भांड अंगावर पडून दीड वर्षाची चिमुकली भाजली
सोलापूर : दुधाचं गरम भांडं घेऊन जात असताना चुकून दीड वर्षाच्या चिमुकलीच्या अंगावर पडल्यानं ती भाजली. शनिवारी पहाटे ४:१५ च्या सुमारास केशव नगर येथे ही घटना घडली. धुमेरा आमीर पटेल (वय- दीड वर्षे, रा. केशव नगर, मौलाली चौक, सोलापूर) असे या भाजलेल्या चिमुकलीचे नाव आहे.
यातील भाजलेली चिमुकली धुमेरा ही झोपलेली होती. शनिवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास तिची आई गरम दुधाचं भांडं घेऊन जात असताना चुकून भांडं खाली झोपलेल्या धुमेराच्या अंगावर पडलं. यात तिच्या अंगावर गरम दूध पडल्याने ती रडत उठली. यामुळे तिच्या अंगावरच्या कातड्याला इजा पोहचली.
त्रास होऊ लागल्यामुळे तिचे वडील अमीर यांनी पहाटे पावणेपाचच्या सुमारास येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिच्यावर उपचार सुरु असून, ती शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सिव्हिल पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.