धक्कादायक! वाहन खरेदीच्या वादातून सुरीने पोटात भोसकून मित्राने मित्राचीच केली हत्या

By रवींद्र देशमुख | Updated: August 2, 2023 11:22 IST2023-08-02T11:22:43+5:302023-08-02T11:22:56+5:30

सांगोल्यात धान्य बाजार या गर्दीच्या ठिकाणी पाहायला मिळाला थरार

A friend killed a friend by stabbing him in the stomach with a knife due to a dispute over the purchase of a vehicle | धक्कादायक! वाहन खरेदीच्या वादातून सुरीने पोटात भोसकून मित्राने मित्राचीच केली हत्या

धक्कादायक! वाहन खरेदीच्या वादातून सुरीने पोटात भोसकून मित्राने मित्राचीच केली हत्या

सोलापूर/सांगोला :  वाहन खरेदी व्यवहारातून झालेल्या वादातून मित्रानेच सुरीने पोटात भोसकून छातीवर वार करून मित्राचा खून केला. ही घटना मंगळवार १ ऑगस्ट रोजी रात्री ८ च्या सुमारास सांगोला शहरातील धान्य बाजार पटांगणात घडली. नवाज अकबर खतीब (२७,रा. सांगोला) असे खून झालेल्या तरुणांचे नाव आहे. उपचारादरम्यान सोलापुरात बुधवारी सकाळी सात वाजता त्या तरुणाचा मृत्यू झाला.

नवाज खतीब व तन्वीर पठाण दोघेही जीवलग मित्र होते. दोघेही वाळूचा व्यवसाय करीत होते. तनवीर पठाण यांनी नवाज खतीबकडून टेम्पो खरेदी केला होता. व्यवहारात करताना नवाजने तनवीर यास सदर वाहनावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे सांगितले होते परंतु प्रत्यक्षात त्या वाहनावर एक गुन्हा दाखल असल्यामुळे तनवीर नवाजवर चिडून होता. याच व्यवहारातून दोघात मंगळवारी रात्री वाद झाला.

या वादातून तनवीरने सूरीने नवाजच्या पोटात भोसकून छातीवर वार केल्याने तो जागेवरच रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला. वडिलांनी नवाजला गंभीर अवस्थेत सांगोल्यात खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यास तातडीने पुढील उपचार करता सोलापूरला घेऊन जाण्याचे सांगितले. सोलापुरात खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान आज सकाळी ७ च्या सुमारास नवाज खतीब याचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली.

Web Title: A friend killed a friend by stabbing him in the stomach with a knife due to a dispute over the purchase of a vehicle