पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 19:01 IST2025-07-06T19:00:36+5:302025-07-06T19:01:27+5:30

पोलिसांनी, प्राथमिक अंदाजानुसार पंढरपुरात सध्या १५ ते २० लाख भाविक असल्याची माहिती दिली आहे.

A flood of devotion, an ocean of Warkaris in the city of Pandharpur; A queue of five kilometers for darshan | पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!

पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. पोलिसांनी, प्राथमिक अंदाजानुसार पंढरपुरात सध्या १५ ते २० लाख भाविक असल्याची माहिती दिली आहे.

आज पहाटे मुख्यमंत्री यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय पूजा संपन्न झाली. पंढरपुरातील दर्शनाची रांग पाच किलोमीटर अंतरापर्यंत पसरली आहे. मागील तीन दिवसांपासून विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. देशाच्या विविध राज्यातील व राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. चेंगराचेगरी सारखा प्रसंग घडू नये यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मंदिर परिसरातील प्रमुख १४ मार्गावर पोलिसांनी नियोजन करून गर्दी आटोक्यात आणली आहे. प्रत्येक मिनिटाला साधारणपणे ३० ते ३५ भाविक दर्शन घेत असल्याची माहिती मंदिर समितीने दिली.

Web Title: A flood of devotion, an ocean of Warkaris in the city of Pandharpur; A queue of five kilometers for darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.