सोलापुरात रेल्वे प्रवासात महिलेच्या गळ्यातील ९० हजारांची चेन हिसकावली

By दिपक दुपारगुडे | Updated: June 17, 2023 16:38 IST2023-06-17T16:38:02+5:302023-06-17T16:38:28+5:30

अहमदाबाद तिरुचिरापल्ली स्पेशल ट्रेनमध्ये १६ जून रोजी मध्यरात्री १:१४ वाजता कुर्डूवाडी डाउन सिग्नलजवळ घटना घडली.

A chain worth 90,000 was snatched from the neck of a woman during a train journey in Solapur | सोलापुरात रेल्वे प्रवासात महिलेच्या गळ्यातील ९० हजारांची चेन हिसकावली

सोलापुरात रेल्वे प्रवासात महिलेच्या गळ्यातील ९० हजारांची चेन हिसकावली

सोलापूर : रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ९० हजारांची सोन्याची चेन खिडकीतून हात घालून हिसका देऊन चोरट्यांनी पळवली. ही घटना अहमदाबाद तिरुचिरापल्ली स्पेशल ट्रेनमध्ये १६ जून रोजी मध्यरात्री १:१४ वाजता कुर्डूवाडी डाउन सिग्नलजवळ घडली. याबाबत सुमेरमल केमराज चोप्रा (रा.अहमदाबाद, गुजरात) यांनी कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी हे रेल्वेने पत्नीसह अहमदाबाद ते कडप्पादरम्यान झोपून प्रवास करत होते. कुर्डूवाडी रेल्वे स्टेशन येण्यापूर्वी सिग्नल नसल्याने डाउन सिग्नलजवळ रेल्वे थांबली. हिच संधी साधून दोन अनोळखीपैकी एकाने खिडकीतून हात घालून बर्थ क्र.६० वर झोपलेल्या फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील चेन ओढून पळवताना पत्नी ओरडली. फिर्यादी जागे झाले अन् त्यांनी त्या चोरट्याचा हात पकडला असता त्याच्या दुसऱ्या साथीदाराने फिर्यादीच्या हातावर चाकूने वार करून जखमी केले. फिर्यादीने हात सोडताच दोघे जण अंधारात चेन घेऊन पळाले.

Web Title: A chain worth 90,000 was snatched from the neck of a woman during a train journey in Solapur