सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का; शहर महिला पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात प्रवेश  

By Appasaheb.patil | Published: November 4, 2022 02:22 PM2022-11-04T14:22:25+5:302022-11-04T14:22:35+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

A | सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का; शहर महिला पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात प्रवेश  

सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का; शहर महिला पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात प्रवेश  

googlenewsNext

सोलापूरसोलापूर शहर महिला राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शहरप्रमुख मनोज शेजवाल, दिलीपभाऊ कोल्हे, जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. 

यावेळी राष्ट्रवादी दक्षिण विधानसभा अध्यक्ष सुनंदा साळुंखे, राष्ट्रवादीच्या शहर मध्य विधानसभा अध्यक्ष राजश्री कोडनूर, शहर कार्याध्यक्षा मनीषा नलावडे, शहर उपाध्यक्षा जयश्री पवार, युवती महिला कार्यकारणी अश्विनी भोसले, शहर महिला कार्यकारणीच्या मारता आसादे, शोभा गवळी व असंख्य महिला कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख तुकाराम मस्के, उपजिल्हाप्रमुख संजय सरवदे, उपजिल्हाप्रमुख राजकुमार शिंदे, बाळासाहेब निकम, शशीकांत शिंदे, सर्व पदाधिकारी व  असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.