घराच्या गॅलरीत गळफास घेऊन केली ५३ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
By रवींद्र देशमुख | Updated: June 7, 2023 18:22 IST2023-06-07T18:22:10+5:302023-06-07T18:22:23+5:30
गॅलरीला असलेल्या लोखंडी अँगलला अज्ञात कारणातून साडीच्या सहाय्याने गळफास घेतला.

घराच्या गॅलरीत गळफास घेऊन केली ५३ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
सोलापूर - जुळे सोलापुरातील एमएससीबी प्लॅन्ट येथे बुधवार ६ जुन रोजी रात्री ८ च्या सुमारास घराच्या गॅलरीत गळफास घेऊन व्यक्तीने आत्महत्या केली. महांतेश महालिंग सिध्दापूर (वय ५३) असे व्यक्तीचे नाव आहे. महांतेश यांच्या राहत्या घराच्या बेडरूमच्या खोलीच्या बाजूला गॅलरी आहे. या गॅलरीला असलेल्या लोखंडी अँगलला अज्ञात कारणातून साडीच्या सहाय्याने गळफास घेतला.
नातेवाईकांनी खाली उतरवले. बेशुध्द अवस्थेत रात्री ८.५० च्या सुमारास मुलगा प्रणव याने उपचारास दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच महांतेश मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.