७८ वर्षीय वृध्दावर चाकूने केला प्राणघातक हल्ला; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

By Appasaheb.patil | Updated: September 29, 2022 12:49 IST2022-09-29T12:49:01+5:302022-09-29T12:49:04+5:30

रामपूर गावातील घटना;तिघांना केली पोलिसांनी अटक

78-year-old man stabbed to death; Incidents in South Solapur Taluka | ७८ वर्षीय वृध्दावर चाकूने केला प्राणघातक हल्ला; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

७८ वर्षीय वृध्दावर चाकूने केला प्राणघातक हल्ला; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

साेलापूर : तुला फार मस्ती आली आहे तुला आता जिवंत सोडत नाही असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवार २८ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांना वळसंग पेालिसांनी अटक केली आहे.

मशाक महिबुब बागवान (वय ७८, रा. संगमेश्वर नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणात शरणाप्पा शिवप्पा कोळी (वय ५८), रवी तुकाराम बागले (वय २६), बनसिद्ध पंडित उर्फ भीमा गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. सिद्धाप्पा उर्फ सिद्धू अर्जुन बनसोडे यास अद्याप अटक करण्यात आली नाही.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रामपूर (ता.द.सोलापूर) शिवारातील फिर्यादी मशाक बागवान यांच्या शेतात शरणाप्पा, रवी, बनसिद्ध व सिद्धाप्पा या चौघांनी संगनमत करून त्या महिलेबाबत तुला काय करावयाचे आहे, तू गप्प बस नाहीतर तुला तुझी शेती खाऊ देणार नाही असे म्हणून ते भांडण मिटवतो असे म्हणून शेतात आले. याचवेळी सिध्दाप्पा याने फिर्यादी मशाक बागवान यांना तुला फार मस्ती आली आहे, तुला आता जिवंत सोडत नाही असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून कमरेजवळ ठेवलेला लोखंडी चाकू काढून जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पोटावर डाव्या बाजूस मारून गंभीर जखमी केले. या घटनेची नोंद वळसंग पेालिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख हे करीत आहेत.

Web Title: 78-year-old man stabbed to death; Incidents in South Solapur Taluka