मालट्रकच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्ध ठार, सोलापूर येथील घटना
By काशिनाथ वाघमारे | Updated: May 8, 2023 18:39 IST2023-05-08T18:38:15+5:302023-05-08T18:39:15+5:30
भरधाव वेगातील ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने वृद्ध जागीच ठार झाला.

मालट्रकच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्ध ठार, सोलापूर येथील घटना
सोलापूर: भरधाव वेगातील ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने वृद्ध जागीच ठार झाला. नजीर मकबुल शेख (वय ६५, राऊतवस्ती, कुर्डूवाडी) असे अपघातात मरण पावलेल्या वृद्धाचे नाव असून हा अपघात रविवार, ७ मे रोजी दुपारी १२.५० वाजण्याच्या सुमारास बार्शी- कुर्डूवाडी रस्त्यावर फक्रुद्दीन आड्ड्यासमोर, बार्शीनाका कुर्डुवाडी येथे घडला.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार मालधक्क्या येथून बार्शीच्या दिशेन भरधाव वेगात निघालेल्या मालट्रक (एम.एच.१२ / एफ. ए. ९१९०) ने नजीर शेख यांना पाठीमागून जोरत धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले. या अपघातप्रकरणी मिठुमियाँ अब्दुलकरीम शेख यांनी कुर्डूवाडी पोलिसांत फिर्याद दिली असून मालट्रकचा चालक सोमनाथ श्रीधर अनंतकवळस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.