शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: सिनेस्टाईल पाठलाग करून आठशे लिटर दारूसह ६.४० लाखांचा  मुद्देमाल जप्त; सोलापुरातील कारवाई

By appasaheb.patil | Updated: March 18, 2023 17:18 IST

Solapur Crime News: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी पहाटेच्या सुमारास नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) या ठिकाणी एका बोलेरो वाहनातून आठशे लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे.

- आप्पासाहेब पाटील सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी पहाटेच्या सुमारास नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) या ठिकाणी एका बोलेरो वाहनातून आठशे लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे यांनी शनिवारी (ता. १८ मार्च) पहाटे दोन वाजेच्या सुमारास त्यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार  सोलापूर- विजापूर हायवे रोडवर सापळा लावला असता  नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) हद्दीत एक जीप रस्त्यावरुन येताना दिसली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन त्यास अडवून तपासणी केली असता त्यामध्ये दोन जण मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून जीपची झडती घेतली असता जीपमध्ये हातभट्टी दारुने भरलेल्या ८ रबरी ट्युब मिळून आल्या. वाहनातील दोन्ही इसमांना अटक करुन सदर वाहन व हातभट्टी दारु जप्त करण्यात आले आहे.

या कारवाईत जीप क्र. MH-13-AQ-0197 हे वाहन जप्त करुन वाहनातील मोठ्या रबरी ट्युबमध्ये १०० लिटरप्रमाणे ८०० लिटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली आहे. जप्त हातभट्टीची वाहतूक करणारे अमोल भोजु पवार व श्रीनाथ सुरेश राठोड रा. दोघेही मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर) यांना अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ८०० लिटर हातभट्टी दारु व वाहन असा एकूण रु. ६ लाख चाळीस हजार आठशे  किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरिक्षक ब-२ विभाग अंकुश आवताडे, सहायक दुय्यम निरिक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे व प्रशांत इंगोले यांनी पार पाडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर