आश्रमशाळेतील ४१ मतिमंद मुलांना कोरोनाची लागण; मंगळवेढ्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 14:06 IST2021-05-28T14:06:03+5:302021-05-28T14:06:08+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

आश्रमशाळेतील ४१ मतिमंद मुलांना कोरोनाची लागण; मंगळवेढ्यातील घटना
सोलापूर - मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील मुक्ताई मतिमंद बालक आश्रमातील ४१ मतिमंद मुलांना कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. त्या संबंधित मुलांना शुक्रवारी पहाटे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव हे शासकीय रूग्णालयात दाखल झाले असून बाधित मुलांची विचारपूस करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.