शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

मेहतांकडून ५ हजार द्रोण; माशाळांनी दिलं १०० किलो तेल; ‘जीएम’ ग्रुपचे चौकाचौकात दीपोत्सवाचे डिजिटल फलक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 2:21 PM

दीपोत्सवात सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर उजळणार; सात प्रमुख संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते लागले कामाला

ठळक मुद्दे‘लोकमत’च्या संकल्पनेतून तीन दिवस पार पडणाºया लक्ष दीपोत्सवशहरातील काही प्रमुख चौकांमध्ये रितसर परवानगी घेऊन डिजिटल फलक लक्ष दीपोत्सवामुळे मंदिर अन् तलाव परिसर उजळून निघणार

सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरासह सोलापूरचे ब्रॅण्डिंग व्हावे, हा धागा पकडून ‘लोकमत’च्या संकल्पनेतून तीन दिवस पार पडणाºया लक्ष दीपोत्सवासाठी माजी नगरसेवक तथा उद्योगपती बाबुभाई मेहता यांनी ५ हजार द्रोण तर चेंबर आॅफ कॉमर्सचे सदस्य पशुपती माशाळ यांनी १०० किलो गोडेतेल देण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, दीपोत्सवाच्या जनजागरणासाठी जी. एम. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांनी शहरातील काही प्रमुख चौकांमध्ये रितसर परवानगी घेऊन डिजिटल फलक लावणार असल्याची घोषणा केली. 

राज्यातील इतर शहरांचे मोठे ब्रॅण्डिंग झाले. ‘सोलापुरात काय नाही, इथे खूप काही आहे’ असे असतानाही सोलापूरचे ब्रॅण्डिंग म्हणावे तसे झाले नाही. गेल्या वर्षी प्रकाशमय यात्रेच्या माध्यमातून वीरशैव व्हिजनने केलेला प्रयत्न कौतुकास्पद होता़ यंदा प्रकाशमय यात्रेतील १०, ११ आणि १२ जानेवारी २०२० रोजी चालणाºया लक्ष दीपोत्सवामुळे मंदिर अन् तलाव परिसर उजळून निघणार आहे. 

‘लोकमत’च्या पुढाकारातून लक्ष दीपोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी वीरशैव व्हिजन, सकल मराठा समाज, हिंदू धनगर सेना, सकल पौरोहित्य कल्याणकारी संस्था व सकल ब्राह्मण समाज, श्री मार्कंडेय जनजागृती संघ, माहेश्वरी प्रगती मंडळ या संघटनांचे पदाधिकारी, सदस्य आपली शक्ती पणाला लावली आहे़ शहरात याबाबत आवाहन पत्रकं वाटण्याचेही काम सुरु आहे. 

सोहळा देखणा अन् नेटका करु- वाघमारे- बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समतेचा संदेश दिला. पुढे हाच संदेश ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामांनी दिला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातही समताच दिसून येते. ‘अशी यात्रा होणे नाही’ अशी समतेच्या यात्रेची प्रचिती येण्यासाठी लक्ष दीपोत्सव पार पडणार आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये डिजिटल फलक लावून जी. एम. ग्रुपच्या वतीने जनजागरण करुन सोहळा नेटका अन् देखणा करु, असा निर्धार जी. एम. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांनी केला.

सोलापुरात सर्व जाती-धर्मातील घटक गुण्यागोविंदाने नांदतात. इथे आजवर कुठलेच नैसर्गिक संकट आले नाही, ती केवळ श्री सिद्धरामांची कृपाच म्हणावी लागेल. यंदा ‘लोकमत’ने लक्ष दीपोत्सवासाठी घेतलेल्या पुढाकारातून सोलापूरचे ब्रॅण्डिंग होण्यास चांगली मदत होणार आहे. लक्ष दीपोत्सवासाठी ५ हजार द्रोणसाठी येणारा २१ हजारांचा खर्च मी स्वत: उचलून सिद्धेश्वर चरणी आपली सेवा बजावणार आहे.-बाबुभाई मेहता,माजी नगरसेवक- भाजप.

सोलापूरचे ब्रॅण्डिंग झाले तर इथला उद्योग, व्यापार वाढणार आहे. ‘लोकमत’ने याच गोष्टीला प्राधान्य देऊन लक्ष दीपोत्सवातून याची प्रचिती आणून देणार आहे. ‘लोकमत’च्या संकल्पनेस सर्व स्तरातील मंडळी पुढे येऊन दीपोत्सवात सहभागी व्हावीत. प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला तरच दीपोत्सव ‘न भूतो न भविष्यती’ असा होणार आहे. माझ्या वतीने १०० किलो गोडेतेल दीपोत्सवासाठी देणार आहे.-पशुपती माशाळ,संचालक- श्री सिद्धेश्वर सहकारी बँक. 

पहिला दिवस पौरोहित्य संस्थेचा- मधुकर कुलकर्णी- पौरोहित्य कल्याणकारी संस्थेचे सकल पौरोहित्य कल्याणकारी संस्थेचे संस्थापक मधुकर कुलकर्णी हे सकल ब्राह्मण समाजाला १० जानेवारी २०२० च्या दीपोत्सवात सहभागी करुन घेणार आहेत. त्यासाठी कुलकर्णी यांनी १० किलो तूप देण्याचे याआधीच जाहीर केले आहे. सोमवारी समाजातील काही मान्यवर आणि महिला मंडळांची बैठक घेऊन योग्य नियोजन करणार असल्याचे मधुकर कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Siddheshwar Yatraसोलापूर सिद्धेश्वर यात्रा