Breaking; सोलापुरात नव्याने आढळले २८ 'कोरोना' बाधित रुग्ण; तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 08:53 IST2020-05-22T08:53:01+5:302020-05-22T08:53:08+5:30
२१८ जणांनी केली 'कोरोना' वर मात; शहरातील कंटेनमेंट झोन'ची संख्या वाढली...!

Breaking; सोलापुरात नव्याने आढळले २८ 'कोरोना' बाधित रुग्ण; तिघांचा मृत्यू
सोलापूर : सोलापुरातील कोरोना बाधित यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गेल्या बारा तासात सोलापुरात नव्याने २८ रुग्णांची वाढ झाली तर तिघा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
सोलापूर शहर व ग्रामीण भागात मागील काही दिवसापासून 'कोरोना' बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. सोलापुरात आत्तापर्यंत ३७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर २१८ रुग्णांनी कोरोना वर मात केली.
सोलापूर आजचा अहवाल....
दि. २२ मे २०२० सकाळी ८
आजचे तपासणी अहवाल -१०८
पॉझिटिव्ह - २८
(पुरुष- १४ - स्त्री- १४ )
निगेटिव्ह - ८०
आजची मृत संख्या - ३ (३ पु )
एकूण पॉझिटिव्ह - ५१६
एकूण निगेटिव्ह - ४६०६
एकूण चाचणी- ५१२२
एकूण मृत्यू - ३७
एकूण बरे रूग्ण- २१८