आजाराने त्रासलेल्या तरुणीने खाल्ल्या २० गोळ्या; उपचार सुरु

By दिपक दुपारगुडे | Published: March 30, 2024 06:45 PM2024-03-30T18:45:07+5:302024-03-30T18:45:16+5:30

यातील तरुणीला गेल्या काही दिवसांपासून नाकाचा त्रास सुरू होता. तो काही केल्या बरा होत नसल्याने नैराश्येतून तिने शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास कोणालाही काही न सांगता घरातील अज्ञात आजाराच्या एकदम २० गोळ्या खाल्ल्या.

20 tablets consumed by a young woman suffering from illness | आजाराने त्रासलेल्या तरुणीने खाल्ल्या २० गोळ्या; उपचार सुरु

आजाराने त्रासलेल्या तरुणीने खाल्ल्या २० गोळ्या; उपचार सुरु

दीपक दुपारगुडे 

सोलापूर : नाकाच्या आजाराने त्रासलेल्या एका तरुणीने चक्क कोणत्यातरी आजाराच्या एकदम २० गोळ्या खाल्ल्या. ही घटना भारतरत्न इंदिरानगर येथे  घडली. शिवलीला प्रकाश बिराजदार (वय २०, भारतरत्न इंदिरानगर, सोलापूर) असे जखमी तरुणीचे नाव आहे.

यातील तरुणीला गेल्या काही दिवसांपासून नाकाचा त्रास सुरू होता. तो काही केल्या बरा होत नसल्याने नैराश्येतून तिने शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास कोणालाही काही न सांगता घरातील अज्ञात आजाराच्या एकदम २० गोळ्या खाल्ल्या.

या प्रकारामुळे तिला त्रास होऊ लागला. नातलगांनी विचारले असता तिने गोळ्या खाल्ल्याचे समजले. तातडीने बहीण लक्ष्मी हिने तिला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरु असून, सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: 20 tablets consumed by a young woman suffering from illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.