शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

करवसुली विशेष मोहिमेत सोलापूर महानगरपालिकेच्या तिजोरीत १५ कोटी जमा, दंडमाफीची सवलत संपली, वसुली सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 1:26 PM

मनपाने थकीत मिळकतकर वसुलीसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत १४ कोटी ९८ लाख रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

ठळक मुद्दे१५ डिसेंबरपासून मिळकतकराची थकबाकी वसुली मोहीम सुरू करण्यात आली होती.पाच प्रमुख विभागीय पथकांमध्ये ४५८ कर्मचाºयांनी कर वसुलीची मोहीम राबविलीकर्मचारी ५२ छोट्या गटांमार्फत झोनमध्ये जाऊन वसुलीच्या कामाला लागले होतेथकबाकी न भरणाºयांचे ९ नळ तोडण्यात आले तर १ मिळकत सील करण्यात आली.   

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २  : मनपाने थकीत मिळकतकर वसुलीसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत १४ कोटी ९८ लाख रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. १५ डिसेंबरपासून मिळकतकराची थकबाकी वसुली मोहीम सुरू करण्यात आली होती. यात पाच प्रमुख विभागीय पथकांमध्ये ४५८ कर्मचाºयांनी कर वसुलीची मोहीम राबविली. हे कर्मचारी ५२ छोट्या गटांमार्फत झोनमध्ये जाऊन वसुलीच्या कामाला लागले होते. शेवटच्या दिवशी कोणतीही विश्रांती न घेता कर्मचाºयांनी वसुली मोहीम राबविली. यात शहर विभागात ९५ लाख १७ हजार ६९0 रुपये रोख तर ३४ लाख ६९ हजार २५१ रुपये धनादेशाद्वारे जमा करण्यात आले. हद्दवाढ विभागात ८७ लाख ४४ हजार ८२0 रुपये रोख तर १२ लाख ७२ हजार ९९६ रुपये धनादेशाद्वारे जमा करण्यात आले. थकबाकी न भरणाºयांचे ९ नळ तोडण्यात आले तर १ मिळकत सील करण्यात आली.   १५ ते ३0 डिसेंबरच्या कालावधीत राबविलेल्या मोहिमेत शहर विभागातून रोख ५ कोटी ५२ लाख २७ हजार ९0४ रुपये तर २ कोटी ३७ लाख ७४ हजार ३0२ रुपये धनादेशाद्वारे जमा झाले. हद्दवाढ भागातून ५ कोटी ४३ लाख ७३ हजार १८७ रुपये रोख तर १ कोटी ६४ लाख ६८ हजार ९७२ रुपये धनादेशाद्वारे जमा झाले. अशाप्रकारे शहरातून ७ कोटी ९0 लाख २ हजार २0६ तर हद्दवाढ विभागातून ७ कोटी ८ लाख ४२ हजार १५९ रुपये असे एकूण १४ कोटी ९८ लाख ४४ हजार ३६५ रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले. मोहिमेत थकबाकी न भरणाºयांचे शहरी विभागात १७९ व हद्दवाढमध्ये ८३ असे २६२ जणांचे नळ तोडण्यात आले तर दोन्ही विभागात मिळून ३८ मिळकती सील करण्यात आल्या.   -----------------दंड,व्याजाची सवलत संपली- मोहीम काळात दंड व व्याज आकारणीत एक टक्का सवलत देण्यात आली होती. १ जानेवारीपासून ही सवलत बंद करण्यात आल्याचे उपायुक्त त्रिंबक ढेंगळे—पाटील यांनी सांगितले. विविध विषयांच्या बैठकांसाठी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे हे मुंबईत आहेत. करवसुलीसाठी मोहिमेसाठी घेण्यात आलेले २00 कर्मचारी त्यांच्या कामाच्या ठिकाणी आजपासून रुजू झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विभागातील खोळंबलेली कामे मार्गी लागणार आहेत; मात्र करसंकलन विभागाच्या कर्मचाºयांवर वसुली मोहीम कायम ठेवण्यात येणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका