शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती निवडणुकीसाठी बार्शी तालुक्यातील १४ हजार शेतकरी राहणार मतदानापासून वंचित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 13:25 IST

सामायिक खात्यावरील एकाच शेतकºयाची नोंद बाजार समिती निवडणुकीच्या मतदार यादीत घेण्याच्या सहकार आणि पणन विभागाच्या निर्णयाचा फटका बार्शी तालुक्यातील १४ हजार ५० शेतकºयांना बसला आहे.

ठळक मुद्देराज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय सहकार, पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी घेतला आहेमतदार यादी तयार करताना ८ अ उताºयाचा आधार घेतला जात आहेउत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी मतदारांची यादी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाला दिली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १३ : सामायिक खात्यावरील एकाच शेतकºयाची नोंद बाजार समिती निवडणुकीच्या मतदार यादीत घेण्याच्या सहकार आणि पणन विभागाच्या निर्णयाचा फटका बार्शी तालुक्यातील १४ हजार ५० शेतकºयांना बसला आहे. या शेतकºयांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत १० गुंठ्यावर शेतजमीन असलेल्या शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय सहकार, पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी घेतला आहे. मतदार यादी तयार करताना ८ अ उताºयाचा आधार घेतला जात आहे. एकाच उताºयावर अनेकांची नावे असतील तर नेमके कोणाचे नाव मतदार यादीत घ्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर सहकार आणि पणन विभागाने उताºयावरील पहिल्या क्रमांकाच्या व्यक्तीचे नाव मतदार यादीत घेण्याचे आदेश दिले होते. बार्शी बाजार समितीच्या गण रचनेची सोडत काढण्यापूर्वी महसूल प्रशासनाने बार्शी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील ९० हजार ५०४ शेतकरी मतदारांची यादी सादर केली होती. ही यादी उताºयावरील सर्वच खातेदारांची नोंद घेऊन करण्यात आली होती. परंतु नव्याने आदेश आल्यानंतर १४ हजार ५० शेतकºयांची नावे वगळण्यात आली आहेत. ही यादी बाजार समितीकडे पाठविण्यात येणार आहे. ------------------------१५ मार्चपर्यंत होतील निवडणुका- च्जिल्हा निवडणूक कार्यालयाने उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी मतदारांची यादी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाला दिली आहे. यावर हरकती मागविण्यात येणार आहेत. बार्शी बाजार समितीचीही यादी जवळपास तयार झाली आहे. उच्च न्यायालयाने या दोन्ही बाजार समित्यांच्या निवडणुकीबाबत कालमर्यादा ठरवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर १५ मार्चपर्यंत या दोन्ही बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता जिल्हा निवडणूक कार्यालयाने वर्तविली आहे.  

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजार