कलिंगडच्या शेतामधून १४ लाखांचा गांजा जप्त; कुर्डूवाडी पोलिसांची कारवाई

By प्रताप राठोड | Updated: March 9, 2023 16:36 IST2023-03-09T16:36:04+5:302023-03-09T16:36:19+5:30

कलिंगडाच्या शेतामध्ये लावलेली १४ लाख ३२ हजाराची गांजाची झाडे कुर्डूवाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

14 lakh ganja seized from Kalingad farm | कलिंगडच्या शेतामधून १४ लाखांचा गांजा जप्त; कुर्डूवाडी पोलिसांची कारवाई

कलिंगडच्या शेतामधून १४ लाखांचा गांजा जप्त; कुर्डूवाडी पोलिसांची कारवाई

सोलापूर : कलिंगडाच्या शेतामध्ये लावलेली १४ लाख ३२ हजाराची गांजाची झाडे कुर्डूवाडी पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई  उजनी (मा) (ता.माढा) येथील अभिमान लोकरे (वय ५५) यांच्या शेतामध्ये करण्यात आली.

उजनी (मा) लोकरे यांच्या कलिंगडच्या शेतामध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत शेतामध्ये लावलेली १२० गांजाची अंदाजे १४१ किग्रॅ. वजनाची झाडे जप्त केली. दरम्यान गांजाच्या झाडाची लागवड केल्याप्रकरणी शेतकरी अभिमान लोकरे यांना अटक केली आहे.

अटकेनंतर त्याला माढा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान कुर्डूवाडी परिसरामध्ये गांजाची मोठ्या प्रमाणावर झाडे जप्त करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: 14 lakh ganja seized from Kalingad farm