शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील ११ हजार ८७८ कृषीपंप ग्राहकांना मिळणार प्रत्येकी स्वतंत्र ट्रान्स्फार्मर

By appasaheb.patil | Updated: November 29, 2018 12:39 IST

अप्पासाहेब पाटील।  सोलापूर : सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनेने त्रस्त झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्यातील कृषीपंपांना आता यापुढे उच्चदाब ...

ठळक मुद्देउच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे (एच़व्ही़डी़एस.) वीज देण्याचा निर्णययासाठी २७६ कोटी रूपयांचे टेंडर मंजूर झाल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिलीआतापर्यंत राज्यात २़६ लाख कृषीपंपांना वीजजोडणी देण्यात आली आहे़

अप्पासाहेब पाटील। 

सोलापूर : सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनेने त्रस्त झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्यातील कृषीपंपांना आता यापुढे उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे (एच़व्ही़डी़एस.) वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ याच मोहिमेतून प्रत्येक नवीन कृषीपंप जोडणी घेणाºया सोलापूर जिल्ह्यातील ११ हजार ८७८ ग्राहकांना एक ट्रान्स्फार्मऱ़़ एक शेतकरी या धर्तीवर वीजजोडणी देण्यात येणार आहे़ यासाठी २७६ कोटी रूपयांचे टेंडर मंजूर झाल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली आहे.

सातत्याने होणारा वीजपुरवठ्यातील खंड, विजेची होणारी चोरी, नियमित होणारे अपघात, एका ट्रान्स्फार्मरवरून १५ ते २० जोडण्या देण्यात आल्या आहेत़ ट्रान्स्फार्मरची क्षमता कमी अन् जोडण्या जास्त अशी अवस्था झाली आहे़ यामुळे ट्रान्स्फार्मरवरील दाब वाढून तो बंद पडण्याच्या घटना घडण्याबरोबर अपघाताचे प्रमाण देखील वाढलेले आहे़ वारंवार खंडित वीजपुरवठा यामुळे शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याची माहिती समोर आली.

या वारंवार घडणाºया घटनांवर आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने मे २०१८ मध्ये उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजजोडणी देण्याची योजना आखली़ त्यानुसार आतापर्यंत राज्यात २़६ लाख कृषीपंपांना वीजजोडणी देण्यात आली आहे़ याचाच भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील ११ हजार ८७८ ग्राहकांना वीजजोडणी देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ यात १० केव्ही, १६ केव्ही व २५ केव्ही या क्षमतेचे ट्रान्स्फार्मर बसविण्यात येणार आहेत़ यासाठीची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली़ सोलापूर जिल्ह्यात २०१४ पासून कृषीपंपांना वीजजोडणी देण्यात आली नाही़ २०१४ पासून आजतागायत ११ हजार ८७८ कृषीपंप ग्राहकांनी महावितरणकडे रितसर अर्ज करून कोटेशन भरले आहे़ अशा वीजजोडणी प्रलंबित ग्राहकांना प्राधान्याने एक ट्रान्स्फार्मऱ़़़एक शेतकरी या धर्तीवर वीजजोडणी देण्यात येणार आहे.

विभाग निहाय जोडणी- सोलापूर ग्रामीण - ११७७- पंढरपूर - २२३२- बार्शी - ५६९२- अकलूज - ११७७

शेतीपंपाची २५ हजार कोटी थकले...- राज्यात २ कोटी १० लाख ग्राहक आहेत़ राज्यात सातत्याने पडणाºया दुष्काळामुळे शेतकºयांची उत्पादन क्षमता कमी झाली आहे़ याशिवाय उत्पादकता कमी झाल्याने अर्थकारण बिघडले आहे़ त्यामुळे राज्यात शेतीपंपांच्या थकबाकीचा आकडा २५ हजार कोटींवर पोहोचला आहे़ अशात यावर्षी शासनाने राज्यातील बहुतांश भागात दुष्काळ जाहीर केला आहे़ यामुळे शेतीपंपाच्या वीज बिल वसुलीला स्थगिती दिली आहे़ तरीही शेतीपंपाला सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण कटिबद्ध असल्याचे सांगितले़ 

विजेची हानी टाळण्यासाठी राज्यातील कृषीपंपांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे जोडण्या देण्यात येणार आहेत़ जिल्ह्यातील ११ हजार ८७८ कृषीपंप ग्राहकांचा त्यात समावेश आहे़ यासाठीची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून, मोहोळ व टेंभुर्णी येथे सुरुवातीचे दोन कनेक्शन देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे़ लवकरच संपूर्ण जिल्ह्यातील ग्राहकांना या प्रणालीद्वारे वीजजोडणी देण्यात येणार आहे़- ज्ञानदेव पडळकर,अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणFarmerशेतकरीagricultureशेती