सापाला वारंवार किस करत I love you म्हणतेय ही तरुणी, व्हिडिओ पाहुन अंगावर येईल काटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 18:24 IST2021-10-25T18:22:08+5:302021-10-25T18:24:42+5:30
किती तरी जण साधा गांडूळ पाहिला तरी घाबरतात. पण ही तरुणी तर एखादं खेळणंच असावं असा खराखुरा साप हातात घेऊन दिसते. फक्त तिने सापाला हातात धरलं नाही तर ती त्याला आय लव्ह यू असं म्हणत त्याला किसही करते आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकी भरेल, घाम येईल आणि अंगावर काटाही येईल.

सापाला वारंवार किस करत I love you म्हणतेय ही तरुणी, व्हिडिओ पाहुन अंगावर येईल काटा
सापाला (Snake Video) पाहिलं तरी आपल्याला घाम फुटतो. त्याच्या जवळ जाणं तर दूरच राहिलं. पण या तरुणीची डेअरिंग तर पाहा, तिने चक्क आपल्या हातातच साप धरला आहे. इतकंच नाही तर तिने सापाला किससुद्धा केलं आहे. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे.
किती तरी जण साधा गांडूळ पाहिला तरी घाबरतात. पण ही तरुणी तर एखादं खेळणंच असावं असा खराखुरा साप हातात घेऊन दिसते. फक्त तिने सापाला हातात धरलं नाही तर ती त्याला आय लव्ह यू असं म्हणत त्याला किसही करते आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकी भरेल, घाम येईल आणि अंगावर काटाही येईल.
व्हिडीओत पाहू शकता महिलेने एका सापाला हातात धरलं आहे. का साप तिच्या चेहऱ्यावर चिकटून बसला आहे. महिला त्याला अगदी कवटाळून आय लव्ह यू म्हणते आणि किसही करते. तेव्हा साप आपलं तोंड उघडतो. थोड्या वेळाने महिला त्याला पुन्हा किस करते. त्यावेळी साप तिच्या चेहऱ्यावरून फिरतो. यानंतर महिला भीतीसारखी प्रतिक्रिया देते. पण खरंतर ती या सापाला बिलकुल घाबरत नाही आहे. सापही तिला काहीच करत नाही.
royal_pythons_ इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मी माझ्या सापावर खूप प्रेम करते, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. हा साप आहे, दंश करणं हा त्याचा स्वभाव आहे आणि तो ते करणारच. अशा दीवांची असा खेळ खेळणं योग्य नव्हे, अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे. तर एका युझरने मात्र हे अद्भुत दृश्य आहे. यालाच खरं प्रेम म्हणतात असं म्हटलं आहे.