गुडघाभर पाण्यात सुर मारायला गेला पण नंतर असे झाले की, व्हिडिओ पाहुन तुम्हाला बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 13:27 IST2021-12-09T13:25:40+5:302021-12-09T13:27:59+5:30

एका तरुणाने जबरदस्त स्टंट तर केला, पण तोच स्टंट त्याच्या अंगाशी आला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. 

young man doing stunt doing flip in water gets injured video goes viral | गुडघाभर पाण्यात सुर मारायला गेला पण नंतर असे झाले की, व्हिडिओ पाहुन तुम्हाला बसेल धक्का

गुडघाभर पाण्यात सुर मारायला गेला पण नंतर असे झाले की, व्हिडिओ पाहुन तुम्हाला बसेल धक्का

अनेक वेळा स्टंटबाजीमुळे लोकांना गंभीर दुखापत होते, त्यानंतर उठणं-बसणंही कठीण होऊन जातं. असाच एक स्टंट व्हिडिओ, सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका तरुणाने जबरदस्त स्टंट तर केला, पण तोच स्टंट त्याच्या अंगाशी आला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. 

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण धावत येतो, स्टंट दाखवत फ्लिप करतो आणि पाण्यात उडी मारतो. पण ज्या पाण्यात तो उडी मारतो, ते पाणी इतकं कमी असतं की, तो थेट तोंडावर आदळतो. या व्हिडीओत पाहून सहज कळतं की, या तरुणाला किती दुखापत झाली असेल. तरुणाची मान पूर्णपणे तळाला आदळते आणि त्या उलटा होऊन पडतो. पण पाणी कमी आहे हे त्याला तेव्हा कळतं, जेव्हा खूप उशीर झालेला असतो. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

खरं म्हणजे या तरुणाने आधी पाणी किती आहे याचा अंदाजच घेतला नाही, आणि असा अंदाज न घेता पाण्यात सुर मारण्याचा प्रयत्न केला. आता गुडघाभर पाण्यास सूर मारायला जाल, तर तोंडावर आपटणार नाही तर काय होणार? हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर सुरेंद्र_सुरू या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत २६ मिलीयन व्ह्यूज मिळाले आहेत, तर १३ लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे.

त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहले ‘भावाला चांगलंच लागलं असेल’ , तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘नशा करुन स्टंट केलं की, हे असं होतं’.

Web Title: young man doing stunt doing flip in water gets injured video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.