नाटु नाटु गाण्यावर युवकाने धरला ठेका, पण पडला गटारात! नेटकरी उडवतयात खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 13:36 IST2022-05-02T13:30:48+5:302022-05-02T13:36:03+5:30
नातु नातु हे गाणं फारच प्रसिद्ध झालंय. अगदी परदेशातही या गाण्यावर रिल्स तयार केले जातात. मग भारतीय नागरिक यात कसे मागे राहतील. अनेकांनी या गाण्यावर रिल्स तयार केले पण हे करताना एका युवकाची फजिती झाली.

नाटु नाटु गाण्यावर युवकाने धरला ठेका, पण पडला गटारात! नेटकरी उडवतयात खिल्ली
साऊथच्या सिनेमांनी जसं बॉलीवुडवर राज्य करायला सुरुवात केलीय तसंच प्रेक्षकांच्या मनातही विशिष्ट स्थान निर्माण केलंय. तुम्ही एस. एस राजामौली यांचा आरआरआर हा सिनेमा पाहिला असेल. त्यात नाटु नाटु हे गाणं फारच प्रसिद्ध झालंय. अगदी परदेशातही या गाण्यावर रिल्स तयार केले जातात. मग भारतीय नागरिक यात कसे मागे राहतील. अनेकांनी या गाण्यावर रिल्स तयार केले पण हे करताना एका युवकाची फजिती झाली.
हा युवक खरंतर गटारावर नातु नातु या गाण्यावर डान्स करत रिल तयार करत होता. पण झालं उलटच. नाचण्याच्या नादात हा गटारातच पडला. तो गटारात पुर्ण पडला नसला अन् त्याचा फक्त पायच भिजला असला तरी नेटकरी मात्र हा व्हिडिओ पाहुन पोट धरुन हसतायत.
हा व्हिडिओ आतापर्यंत ७६ लाख लोकांनी पाहिला आहे. एकाने यावर कमेंट करत म्हटलंय अजून करा गटारात डान्स. अनेक युजर्सनी यावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.